श्रीराम मांसाहारी होते… अकलेचे तारे तोडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक

भाजयुमो कर्यकर्त्यांचे मुंबईत जितेद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (sharad pawar) गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra ahwad) यांनी बुधवारी शिर्डीतील शिबिरात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उद‌्भवला आहे. ‘श्रीराम हे मांसाहरी होते’ असे वक्तव्य करणाऱ्या आव्हाड यांच्याविरोधात भाजपने राज्यभर तीव्र आंदोलन सुरु केले आहेत. मुंबईतील भाजप आमदार राम कदम (Ram kadam) यांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. अनेक कार्यकर्त्यांना घेऊन ते घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.
घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकाळी मोठी गर्दी केली होती. ‘श्रीरामजी का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ ‘अटक करा अटक करा, जितेंद्र आव्हाडांना अटक करा’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
केवळ मुंबईच नव्हे तर पुणे, नाशिक, पुणे आदी शहरांमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केले आहे.

श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा. त्यांच्याकडे पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, रामभक्तांची माफी मागावी. असे वक्तव्य करणे हे आव्हाडांचे राजकारण आहे, षडयंत्र आहे. वारंवार हिंदू समाजाची थट्टा उडवणे, त्यांच्या भावना दुखावणे हा प्रकार त्यांच्याकडून वारंवार होतो. एखाद्या समाजाला खूश करण्यासाठी, त्यांची व्होट बँक मिळवण्यासाठी हे प्रकार केले जातात. आम्ही आव्हाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करु, असे आमदार राम कदम म्हणाले.

पवार, ठाकरे गप्प का?महाविकास आघाडीचे नेते असलेले जितेंद्र आव्हाड हे श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यांचे नेते शरद पवार, मित्रपक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) गप्प का आहेत. उद्धव ठाकरे यांचे पूर्वीसारखे हिंदुत्व राहिलेले नाही. ते ‘मातोश्री ३’ उभे करण्यातच मग्न आहेत, अशी टीकाही राम कदम यांनी केली.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले होते.