युट्यूब चॅनेलसाठी टास्क देऊन तरुणाची ८ लाखांची फसवणूक

सहकारनगर परिसरातील एका तरुणाला टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत त्यांना पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली एका युट्यूब चॅनेलचे टास्क देऊन ८ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात टेलीग्राम धारक व विविध बँकांचे खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : सहकारनगर परिसरातील एका तरुणाला टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत त्यांना पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली एका युट्यूब चॅनेलचे टास्क देऊन ८ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात टेलीग्राम धारक व विविध बँकांचे खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धनकवडी येथील तरुणाने तक्रार दिली आहे. हा प्रकार ४ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला टेलीग्रामच्या ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला. त्याला पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखविले. त्याला युट्यूब चॅनेनला टास्क देऊन त्याबदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. प्रथम त्याला परतावाही दिला. त्यानंतर त्याला आणखी टास्क देण्यासाठी व वेगवेगळ्या कारणासाठी ८ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र, त्याला कसलाही परतावा न देता त्याची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics