हाती घड्याळ ठेवून आमदार नीलेश लंके यांनी वाजवली तुतारी; अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्याविरोधात लढणार

Ahmadnagar Loksabha-Bjp's Sujay vikhae V/s Ncp's MLA Nilesh Lanke Fight शरद पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करुन दिले पक्षांतराचे संकेत

Ahmadnagar Loksabha-Bjp’s Sujay vikhae V/s Ncp’s MLA Nilesh Lanke Fight

अहमदनगर : राष्ट्रवादीतील बंडाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी ८ ते ९ महिन्यातच पुन्हा शरद पवार (Sharad Pawar’s NCP) गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळण्याच्या अटीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. असे असले तरी अजून लंके यांनी अजितदादा गटाचा (Ajit Pawar’s NCP) राजीनामा दिलेला नाही की शरद पवार गटात प्रवेशही केलेला नाही. मात्र १४ मार्च रोजी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

कोरोना काळात स्वखर्चाने शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी शिबिर चालवणारे आमदार लंके (MLA Nilesh Lanke) यांचे काम त्या काळात राज्यभर गाजले. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. नंतर जुलै २०२३ मध्ये अजितदादांनी बंड केल्यानंतर लंके आधी शरद पवार सोबत राहणार असल्याची चर्चा होती, पण अचानक सत्ताधारी अजितदादांच्या (Ajit Pawar’s NCP) मागे ते गेले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते परत शरद पवार गटात (Sharad Pawar’s NCP)  येण्यास सज्ज झाले आहेत.

Ahmadnagar Loksabha-Bjp’s Sujay vikhae V/s Ncp’s MLA Nilesh Lanke Fight

पुस्तक प्रकाशनावेळी हाती तुतारी

कोरोना काळात केलेल्या कामाचा आढावा घेणारे ‘मी अनुभवलेला कोराना’ हे नीलेश लंके MLA Nilesh Lanke यांच्या पुस्तकाचे १४ मार्च रोजी पुण्यात प्रकाशन झाले. यावेळी शरद पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात जयंत पाटील Ncp State President Jayant Patil यांनी ‘तुतारी’ चिन्ह हाती देऊन लंके हे अहमदनगरमधून आमचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिले. पण लंके यांनी अजून पक्षप्रवेशाबाबत अधिकृत काही बोलण्यास नकार दिलाय.

पवार साहेब सांगतील ते करू

शरद पवार साहेबांचे विचार आम्ही कधीच सोडले नव्हते, कधी सोडणारही नाही. आजही माझ्या कार्यालयात शरद पवार साहेबांचा फोटो आहे. ते सांगतील तसेच होईल’ असे सांगून आमदार लंके यांनी जयंत पाटील यांनी दिलेल्या संकेतांना एकप्रकारे दुजोराच दिला.

अजित पवार म्हणाले, त्याच्या डोक्यात हवा घातलीय

आमदार लंकेंनी शरद पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने अजित पवार गटाला धक्का बसल्याचे मानले जाते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘नीलेश पारनेरपुरता लोकप्रिय जरुर आहे. पण काह लोकांनी त्याच्या डोक्यात खासदारकीची हवा घातली आहे. दोन दिवसांपूर्वी मी त्याच्याशी चर्चा केली. महायुतीतील एका मंत्र्याविषयी (विखेंबद्दल) त्याच्या काही तक्रारी आहेत. आपण त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवू असे मी त्याला सांगितले आहे.’

विखेविरोधात देणार लढत Ahmadnagar Loksabha-Bjp’s Sujay vikhae V/s Ncp’s MLA Nilesh Lanke Fight

दक्षिण अहमदनगर South Ahmadnagar Loksabha लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी आमदार लंके यांनी पवार गटाचा रस्ता धरल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून लंके विरुद्ध विखे असा संघर्ष नगर जिल्ह्यात सुरु आहे. विखेंनी लंके यांची कामे अडवून ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे. अजित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे ते मान्य केले आहे. त्यामुळे या लोकसभेला विखेंविरोधात लढण्याचा निर्धार लंके यांनी केला होता. भाजप व अजितदादा गट महायुतीत असल्याने ते एकमेकाविरोधात उमेदवार देऊ शकत नाहीत. त्यामुळे लंकेंनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याचा शब्द घेतल्याचे समोर आले आहे.

विखे- पवार जुनेच वैर Vikhe-Pawar is an old enemy

दक्षिण अहमदनगर लोकसभेची निवडणूक सुजय विखे विरुद्ध आमदार नीलेश लंके यांच्यात होणार असली तरी खऱ्या अर्थाने ही लढत पवार विरुद्ध विखे घराण्याचीच आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील व शरद पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. ही ‘परंपरा’ राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार- अजित पवार यांनीही चालवली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा काँग्रेसचे तत्कालिन नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला मुलगा डॉ. सुजय याच्यासाठी राष्ट्रवादीने सोडावी असा प्रस्ताव दिला होता. मात्र तो शरद पवार यांनी मान्य केला नाही. नगर जिल्ह्यात विखेंचे चांगले वर्चस्व असल्याने त्यांना विजयाची हमी होती. राष्ट्रवादी जागा सोडत नसल्याने सुजयने भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली व विजयीही झाले. त्यानंतर चार- सहा महिन्यात राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात आले.

अजितदादा गटही करु शकेल छुपी मदत Ajit Pawar’s secret help to MLA Lanke

आता या निवडणुकीत विखेंच्या मुलाला पाडण्यासाठी शरद पवार यांनी लढवैय्या आमदार लंके यांना हाताशी धरले आहे. ते चांगली लढत देतील, अशी अपेक्षा आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी नीलेश लंके अजितदादा गट सोडणार असले तरी विखेंच्या पराभवासाठी नगर जिल्ह्यातील अजितदादा गट महायुतीचा धर्म विसरुन लंके यांना अप्रत्यक्ष मदत करु शकतात, असे आडाखेही बांधले जात आहेत. दोन्ही पवारांच्या ताकदीच्या जोरावरच आमदार लंके मैदानात उतरलेले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics