Amrawati Loksabha-Battle of Navneet Rana and Bachu Kadu
अमरावती : अमरावती मतदारसंघातील अपक्ष खासदार नवनीत राणा Navneet Rana यांना अखेर भाजपने उमेदवारी जाहीर केली. मात्र या निर्णयाला महायुतीतील मित्रपक्षाचे नेते व स्थानिक आमदार बच्चू कडू MLA Bacchu Kadu, शिंदेसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ Former MP Anandrao Adsul यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला होता. शेवटच्या टप्प्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही ‘नवनीत राणा नकोच’ Say No to Navneet Rana अशी भूमिका मुंबईत जाऊन मांडली. मात्र यापैकी कोणाचीही तमा न बाळगता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी राणांना उमेदवारी दिलीच. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू, अडसूळ यांनी आता महायुतीचा धर्म बाजूला ठेवून राणांना पराभूत करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे फडणवीसांचा राणांबाबतचा निर्णय भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री म्हणून पडद्यावर गाजलेल्या नवनीत राणा Navneet Rana यांनी अमरावती जिल्ह्यातील युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांच्याशी लग्न केले अन् तिथूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमरावतीमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीने त्यांना पाठिंबा दिला. या जोरावर नवनीत राणांनी शिवसेनेचे तेव्हाचे उमेदवार आनंदराव अडसूळ Anandrao Adsul यांचा ३६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
मात्र काही महिन्यातच राणा दांपत्याने काँग्रेस- राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपशी जवळीक वाढवली. उद्धव ठाकरे Udhav Thackeray मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने ठाकरेंवर टीका करण्यासाठी जी फौज उतरवली त्यात राणा दांपत्य अग्रेसर होते. हनुमान चालीसाच्या मुदद्यावर त्यांनी ठाकरेंवर घनघोर टीका केली, तुरुंगात जाऊन त्याची किंमतही चुकवली. भाजपप्रती इतकी निष्ठा दाखवून राणांनी तेव्हाच आपली उमेदवारी पक्की केली होती.
बच्चू कडूंचा विरोध का? Why Bachu Kadu opposed Rana?
२०१९ मध्ये राणांकडून पराभव झाल्यामुळे आनंदराव अडसूळ Anandrao adsul त्यांच्यावर नाराज असणे साहजिक होते. मात्र मित्रपक्षाचे असूनही आमदार बच्चू कडू हे नवनीत राणांवर इतके नाराज का? याचे कारण म्हणजे रवी राणा Ravi Rana व बच्चू कडू Bachhu Kadu यांच्यात टोकाचे राजकीय हाडवैर आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्यात अनेकदा वाद झाले. मात्र महायुतीत राणा भाजपकडून व कडू शिंदेंकडून असल्याने नाईलाजाने या दोघांना एकत्र यावे लागले. मात्र त्यांच्यातील वाद संपले नाहीत. शिंदेंनी Eknath Shinde बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गुवाहटीला गेलेल्या कडू यांना ‘खोकेवाले’ म्हणून राणांनी हिणवले होते. घरात घुसून मारण्याची धमकी देण्यापर्यंत राणांची मजल गेली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे Eknath Shinde- फडणवीस Devendra Fadanvis यांनी मध्यस्थी केल्याने बच्चू कडू शांत बसले. मात्र राणांविषयीचा राग त्यांच्या मनात अजूनही धुमसत आहे.
अडसूळांचाही उमेदवारीवर दावा Adsul’s claim on Amaravati seat
अमरावती हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा आहे. २०१९ मध्ये पराभव झाला असला त्यापूर्वी इथून शिवसेनेचाच खासदार निवडून येत होता. त्यामुळे या मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा दावा आनंदराव अडसूळ Anadrao Adsul यांनी केला होता. मात्र विद्यमान खासदाराला प्राधान्य या महायुतीतील नियमामुळे अडसूळ यांचा दावा मान्य करणे एकनाथ शिंदेंनाही जमले नाही. गेल्या काही दिवसांत अडसूळ, बच्चू कडू यांनी अनेकदा मुंबई वाऱ्या करुन काहीही झाले तरी राणांना उमेदवारी देऊ नका, असे विनंतीवजा इशारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. चार दिवसांपूर्वी तर भाजपचेही काही स्थानिक नेते फडणवीसांकडे याच मागणीसाठी गेले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फार महत्त्व दिले नाही. या सर्वांचा विरोध झुगारुन २७ मार्च रोजी भाजपने नवनीत राणा Navneet Rana gets BJP’s Ticket in Amarwati यांची उमेदवारी जाहीर केली. तोपर्यंत त्या भाजपच्या प्राथमिक सदस्यही नव्हत्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा यांनी रात्री नागपूरमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी आपले पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाच राजीनामाही दिला.
बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणांना पाडणार
आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘ज्यांनी आजवर भाजपला शिव्या घातल्या. आंदोलने करुन भाजप कार्यालये फोडली त्यांचेच झेंडे हाती घेण्याची वेळ आता भाजप कार्यकर्त्यांवर आली आहे. एवढी लाचारी अमरावतीचा कार्यकर्ता स्वीकारणार नाही. हल्ला करणाऱ्यांचा सूड घेतल्याशिवाय तो राहणार नाही. अमरावतीत आम्ही महायुतीचा धर्म बाजूला ठेऊन नवनीत राणांविरोधात प्रचार करणार. एखादी जागा कमी आली तरी भाजपला काही फरक पडत नाही. काहीही झाले तरी इथे राणांना आम्ही पाडणारच,’ असे कडू म्हणाले.
राणांच्या जातप्रमाणपत्रावर संशय Doubt on Navneet Rana’s caste certificate
अमरावती हा अनुसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. त्या प्रवर्गातील प्रमाणपत्र सादर करुन नवनीत राणांनी गेल्या वेळी निवडणूक लढवली. मात्र हे प्रमाणपत्रच बेकायदा असल्याचे आनंदराव अडसूळ यांचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मात्र पाच वर्षांची टर्म संपली त्याचा अजून अंतिम निकाल लागलेला नाही. निवडणूकीपूर्वी जर राणांचे जातप्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले तर त्यांची उमेदवारी आपोआपच बाद होईल. मात्र आता सत्ताधारी पक्षाची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रमाणपत्र बाद होण्याचा राणा यांना अजिबात धोका वाटत नाही.
एकूणच अमरावतीची निवडणूक यंदा खूपच रंजक होणार आहे. या ठिकाणी विरोधी पक्षाचा उमेदवार कोण? यावर चर्चा होण्यापेक्षा नवनीत राणांना पाडण्यासाठी मित्रपक्षाचे कोण कोण सरसावते आहे, यावरच अधिक खल सुरु आहे.