मंत्री सावेंच्या विजयासाठी काँग्रेस, वंचितही सरसावली

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मराठवाड्यात काँग्रेस पुनरुज्जीवित होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हाती आलेली संधी कशी गमवायची, हे शिकण्यासाठीही काँग्रेसला आपल्याच पक्षाच्या भूमिकेशिवाय दुसरे चांगले उदाहरण सापडत नाही म्हणतात याच प्रचिती पुन्हा येत आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधण्यापेक्षा दुबळा उमेदवार कसा शोधता येईल याचे वेगवेगळे प्रयेाग पक्षाकडून केले जात आहेत. यातूनच २४ तासात एका नवख्या उमेदवाराची तिकिट कापण्याची नामुष्की काँग्रेसवर आेढावली आहे. मंत्री सावेंच्या विजयासाठी विरोधी गटात असलेले पक्षच कसे हातभार लावत आहेत याविषयी आपण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

सावे तिसऱ्यांदा विधानसभेच्या मैदानात…

औरंगाबाद शहर व जिल्ह्याचे नामांतर शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर असे केले. मात्र अजूनही काही कायदेशीर तरतूदींमुळे औरंगाबाद विमानतळ, औरंगाबाद हायकोर्ट आणि औरंगाबाद मतदारसंघ ही नावे जुनीच कायम आहेत. त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा आैरंगाबाद पूर्व व आता लोक ज्याला छत्रपती संभाजीनगर पूर्व म्हणतात असा हा मतदारसंघ. २०१४ व २०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे हे विजयी हेात आहेत. दोन वेळा त्यांना मंत्रिपदाची संधीही मिळाली. आता तिसऱ्यांदा ते विधानसभेच्या मैदानात आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा चांगला प्रभाव असल्यामुळे गेल्या दोन निवडणुकात अतुल सावे यांना विजयासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेस पक्षाने इथून विजयाची आशाच सोडली होती. त्यामुळे गेल्या वेळी पूर्व मतदारसंघ मित्रपक्ष समाजवादी पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र एमआयएमचे गफार कादरी यांनी मुस्लिम मतांच्या जोरावर सावेंना जोरदार फाईट दिली होती. आता मात्र लोकसभा निवडणुकीपासून मुस्लिम मतदार पुन्हा काँग्रेस पक्षाकडे वळाल्याचे दिसून येते. त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने सावेंविरोधात मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी होत होती.

अन् लहू शेवाळेंना उमेदवारी जाहीर…

मात्र काँग्रेसने अचानकच निवृत्त शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांना तिकिट जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला. जे देशमुख काँग्रेस पक्षाचे साधे सदस्यही नाहीत त्यांना अचानक उमेदवारी कशी काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला. कार्यकर्त्यांनी व इच्छूक उमेदवारांनी याबाबत पक्षाला जाब विचारला. प्रकरण इतके पेटले की राज्याती पक्षनेतृत्वाने पैसे घेऊन देशमुखांना तिकिट दिले, सावेंविरोधात मुद्दाम दुबळा उमेदवार दिला असे आरेापही झाले. पण सावे ओबीसी असल्याने त्यांच्याविरोधात मराठा उमेदवार द्यायचा या उद्देशाने देशमुख यांना तिकिट दिल्याचे पक्षाकडून सांगितले जाते. पण जर मराठाच उमेदवार द्यायचा हेाता तर काँग्रेसमध्ये निष्ठावंत मराठ्यांची कमतरता आहे का? असा प्रश्नही कार्यकर्ते विचारत होते. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला. त्यामुळे अखेर एकाच दिवसांत देशमुखांचे तिकिट कापून लहू शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांचे नाव एेकूनही काँग्रेस कार्यकर्ते अधिक बुचकाळ्यात पडले. कारण लहू कानडे कोण हेही बहुतांश लोकांना माहिती नव्हते.

शेवाळें यांनाच तिकिट का?

धनगर समाजाचे नेते असलेले कानडे हे मल्हार सेनेचे राज्य प्रमुख आहेत. त्यांनी २००४ मध्ये लोकराज्य पक्षातर्फे छत्रपती संभाजीनगरात लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी त्यांना अवघी ६ हजारही मते पडली नव्हती. भाजपच्या कामगार आघाडीतही त्यांनी ६ वर्षे काम केले. ता पाच वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, देशमुख यांचे तिकिट कापल्यावर ते कुणाला द्यावे असा प्रश्न काँग्रेससमोर होता. ओबीसीतील एक युवा नेता राजेश मुंडे यानेही तिकिट मागितले होते, पण त्यांचा विचारहंी झाला नाही. पण मराठवाड्यात धनगर समाजाला काँग्रेसने एकही तिकिट दिले नाही हा रोष समाजात होता. तो दूर करण्यासाठी संभाजीनगर पूर्वमधून शेवाळे यांना तिकिट देण्यात आल्याचे सांगितले जाते. म्हणजे मतदारसंघ सोडायचाच होता, हे गृहित धरुनच इथे उमेदवार देण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुुरु हेात्या काय? अशी शंका घ्यायला वाव आहे.

इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर…

दुसरीकडे, आता अतुल सावे यांच्यासमोर एमआयएमने माजी खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम मतांच्या जोरावर आपण सावेंना पराभूत करु, असा निर्धार इम्तियाज यांनी केला होता. पण त्यांचा प्लॅन उधळून लावण्याची खबरदारी वंचित आघाडीने घेतली आहे. वंचितने आधी पूर्व मतदारसंघातून विकास दांडगे यांना तिकिट दिले होते. पण इम्तियाज यांनी उमेदवारी जाहीर करताच वंचितने दांडगेंची उमेदवारी रद्द करुन तिथे अफसर खान यांना उमेदवारी दिली. म्हणजे मुस्लिम मतांचे विभाजन कसे होईल याची खबरदारी वंचितने घेऊन भाजपच्या विजयाच मार्ग मोकळा केला असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अफसर खान हे वंचितचे उमेदवार होते, त्यांनी मुस्लिम मतांचे विभाजन करुन इम्तियाज यांची मते कापली होती, असा आरोप होत आहे.