दहा वर्षे खासदार राहिलेल्या बहिणीला घरी बसवूनच पंकजा मुंडेंच्या बीडमधील खासदारकीचा मार्ग मोकळा

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर

Beed Loksabha- MP Pritam’s Sacrifice for sister Pankaja Munde
बीड :
‘मी दोन महिने घरात बसले तर माझ्याविषयी अनेक वावड्या उठविण्यात आल्या. आता प्रीतमताई (Pritam Munde) घरी बसतील आणि मी निवडणूक लढवावी असे कुणी म्हणत असेल ते चालणार नाही’…

पाच महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झालेल्या दसरा मेळाव्यातून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्याच पक्षनेतृत्वाला दिलेला हा इशारा महाराष्ट्रातील मुंडेप्रेमी जनता विसरलेली नाही. पण अशी डरकाळी फोडणाऱ्या फायरब्रॅन्ड नेत्या पंकजा मुंडे यांना मात्र आपल्या या निर्धारापासून माघार घ्यावी लागल्याचे दिसून आले.

भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २० लोकसभा उमेदवारांच्या Loksabha Eletion यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव आहे. त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना भाजपने तसे अडगळीतच टाकले होते. दरवेळी राज्यसभा निवडणूक असो की विधान परिषदेची निवडणूक, प्रत्येक वेळी पंकजाताईंचे नाव चर्चेत यायचे. मात्र एेनवेळी त्यांच्याएेवजी दुसऱ्यांनाच संधी मिळायची. ही खंत स्वत: पंकजा मुंडे यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले नगर जिल्ह्यातील कर्जतचे राम शिंदे यांच्यासारख्या नेत्याचेही भाजपने विधान परिषदेवर पुनर्वसन केले, मात्र पंकजांना भाजपने अशी संधी काही दिली नाही. या दुर्लक्षाला स्वत: पंकजाच कारणीभूत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

फडणवीसांशी वादामुळे पंकजांची चहूबाजूने कोंडी Pankaja Munde is in trouble all around

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fandanvis) हे भाजपचे सर्वोच्च नेते मानले जातात. मात्र पंकजा यांनी त्यांच्याशीच पंगा घेतल्यामुळे त्यांच्यावर साडेचार वर्षे राजकीय वनवास भोगण्याची वेळ आली होती. Pankaja Munde Devendra Fadnavis controversy जाहीर मेळाव्यातून आपल्याच पक्षनेतृत्वाला देण्यात येणारे इशारे त्यांच्या अंगलट आले. ‘आता पडायचे नाही तर उमेदवार पाडायचे’ अशी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या पंकजांविषयी पक्षनेतृत्वाच्या मनात रोष होता. त्यामुळे त्यांना संधी मिळू शकली नाही. इतकेच काय महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी भाजपने त्यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारी पद दिले होते. तिथेही पंकजा यांनी चांगले संघटन कौशल्य दाखवले. पण एेन विधानसभा निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातूनही त्यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे तेथील भाजपच्या यशाचे श्रेयही पंकजा यांना मिळू शकले नाही.

इकडे महाराष्ट्रातही त्यांची आर्थिक कोंडी केली जात होती. Pankaja Munde in financial crisis केंद्र सरकारने महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांना थकहमी जाहीर केली, त्यात अगदी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांवरही कृपा करण्यात आली. मात्र भाजपच्या एकनिष्ठ असूनही पंकजांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला यातून वगळण्यात आले. उलट जीएसटी, पीएफ थकबाकी वसूलीसाठी जप्तीची नामुष्की पंकजा यांच्या कारखान्यावर आली. आता पक्षनेतृत्वाशी फार वैर घेणे परवडणारे नाही, याची जाणीव पंकजा यांना झाली होती.
Beed Loksabha- MP Pritam’s Sacrifice for sister Pankaja Munde

देर आए, दुरुस्त आए

मध्यंतरी या सर्व चूका त्यांच्या लक्षात आल्या. त्यामुळे दोन महिने राजकीय वर्तुळापासून दूर राहून त्यांनी आत्मचिंतन केले. या काळात पंकजा अध्यात्माकडे अधिक झुकल्या. यानंतर मात्र पंकजा Pankaja Munde अधिक संयमी व समंजसपणे वागू लागल्या. पक्षातील नेत्यांविषयी समजुतीच्या स्वरात बोलू लागल्या. त्यांच्या या पश्चात बुद्धीची भाजप श्रेष्ठींनीही दखल घेतली. त्याचेच फळ म्हणून पंकजाताईंना बीड लोकसभेची उमेदवार जाहीर करण्यात आली. त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्ध्यांकडे फारसा सक्षम उमेदवार नसल्याने पंकजांच्या खासदारकीचा मार्गही मोकळा झाला आहे. पण अनेक कार्यकर्त्यांचा मोठमोठ्या पदावर बसवणाऱ्या पंकजाताईंना आपल्या खासदारकीसाठी मात्र स्वत:च्या १० वर्षे खासदार राहिलेल्या सख्या बहिणीला घरी बसवण्याचे दु:ख पचवावे लागेल, हे त्यांच्यासाठी क्लेशदायकच म्हणावे लागेल.

Beed Loksabha- MP Pritam’s Sacrifice for sister Pankaja Munde

प्रीतमताईंचा त्याग, धनंजय यांची मध्यस्थी

  • २०१४ ते २०१९ या फडणवीस सरकारच्या काळात पंकजा मुंडे Pankaja Munde कॅबिनेट मंत्री होत्या. या काळात त्या सामान्य जनतेला फारशा उपलब्ध होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र बीड जिल्ह्यात खासदार म्हणून डॉ. प्रीतम मुंडे यांचा संपर्क चांगला होता. अगदी सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी एेकून घेण्यापासून ते काम पूर्ण करेपर्यंत त्यांचा पाठपुरावा असायचा.
  • दहा वर्षे बीडच्या खासदार म्हणून काम करताना पंकजा यांच्यापेक्षाही प्रीतमताईंना  Pritam Munde चांगली लोकप्रियता मिळाली होती. दबंग खासदार म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जायचा.
  • मात्र राजकीय वनवासात गेलेल्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या पुनर्वसनासाठी प्रीतम यांना आपल्या खासदारकीचा त्याग करावा लागला. भविष्यात त्यांचे कुठे राजकीय पुनर्वसन होईल का? याविषयीही शाश्वती नाही. मात्र बहिणीच्या भवितव्यासाठी एका शब्दावर खासदारकीचा त्याग करण्याची तयारी दाखूनन प्रीतम यांनी बीडकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
  • धनंजय मुंडे Dhananjay Munde ज्या राष्ट्रवादीत आहेत त्या पक्षाची व भाजपची युती झाली आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही परळीतून पंकजा यांना उमेदवारी मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. शेजारच्या पाथर्डी मतदारसंघातूनही त्यांनी चाचपणी केली, पण ती जागाही फारशी सुरक्षित वाटली नाही. त्यामुळे ‘मला मतदारसंघ राहिला नाही’ अशी खंत काही दिवसांपूर्वी पंकजा यांनी बोलून दाखवली होती.
  • परळीतून उमेदवारी नाही, विधान परिषद- राज्यसभा मिळत नाही. मग अशा वेळी बहिणीच्या जागेवर बीडमधून लोकसभेला आपणच उभे राहण्याशिवाय पंकजांसमोर पर्याय नव्हता. त्यामुळे नाईलाजाने त्यांना बीडची उमेदवारी स्वीकारावी लागली.
  • खरे तर पंकजा मुंडे यांना दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रातच काम करण्याची इच्छा आहे. मात्र आता आपलेच घोडे दामटून चालणार नाही, पक्ष सांगेल ते स्वीकारा व नंतर संधी मिळताच पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची संधी मिळवा, हे धोरण त्यांनी स्वीकारलेले दिसते.
  • पंकजा मुंडे Pankaja Munde व देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्यातील मतभेद दूर करण्यात त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांची भूमिका मोलाची मानली जाते. त्यांच्या समजावण्यामुळेच पंकजा यांची भाजप नेतृत्वाविषयी आक्रमक भूमिका मवाळ झाल्याचेही निकटवर्तीय सांगतात. या संयमाचे फळ म्हणूनच पंकजांची खासदारकीची वाट मोकळी झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics