Beed Loksabha : बीड मतदारसंघात मराठा उमेदवारांनीच केला पंकजा मुंडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर

बजरंग सोनवणे, ज्योती मेटे, अशोक हिंगे या तीन मराठा उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडणार

बीड :  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या उमेदवारीमुळे बीड लोकसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत आला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्याकडूनच परळीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनासाठी तब्बल साडेचार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. भाजप नेतृत्वाने या काळात त्यांचा विधान परिषद, राज्यसभेसाठी विचारही केला नसल्याची खंत पंकजा यांनी वेळोवेळी बोलून दाखवली. त्याला पंकजा यांचा स्वभावही कारणीभूत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्याशी कायम स्पर्धा करण्याची किंमत पंकजा यांना वेळोवेळी मोजावी लागली. मात्र आता राजकारणात टिकून राहायचे असेल तर पक्षनेतृत्वाशी जुळवून घ्यावे लागेल, याची जाणीव त्यांना झालीय. याच समजूतदारपणामुळे त्यांना आता भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

पंकजाताईंसाठी बहिणीने केला त्याग Sister Pritam’s sacrifice for Pankaja

गोपीनाथराव मुंडे Gopinath Munde यांच्या निधनानंतर पंकजा यांच्या धाकट्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे Pritam Munde सुमारे १० वर्षे बीडच्या खासदार होत्या. मागील साडेचार वर्षे पंकजा मुंडे कोणत्याही घटनात्मक पदावर नसल्याने डॉ. प्रीतम यांच्या खासदारकीच्या जोरावरच दोघी बीड जिल्ह्यात आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. डॉ. प्रीतम उच्च शिक्षित आहेत. सामान्य जनतेशी त्यांचा सहज संपर्क होत असल्याने मधल्या काळात त्यांना जनतेतून चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र थोरल्या बहिणीचे राजकीय करिअर सावरण्यासाठी प्रीतम यांनी आपल्या खासदारकीच्या हॅटट्रीकचा मोह सोडून उमेदवारीचा त्याग केला. त्यामुळेच पंकजा Pankaja Munde यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळू शकली.

मराठा समाजाचा रोष हे पंकजांसमोर आव्हान Anger of the Maratha community is a challenge for Pankaja

उमेदवारी मिळवण्यासाठी पंकजा यांना जेवढा संघर्ष करावा लागला, तेवढाच प्रचारादरम्यान मराठा समाजाच्या रोषाचाही त्यांना सामना करावा लागला. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या मराठा आरक्षण Maratha Resevation आंदोलनाचा बीड जिल्ह्यावर तीव्र प्रभाव आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलेले नसल्याने हा समाज या सरकारवर विशेषत: भाजपवर नाराज आहे. लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून ही नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. Maratha V/s Obc battle in Beed .सध्या बीड, जालनासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा सुप्त संघर्ष पेटलेला आहे. यातूनच सर्वच मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाकडून ओबीसी उमेदवाराचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे सुप्त मेसेजही पसरवले जात आहेत. स्वत: मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आपण कोणाचाही प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेले असले तरी ‘तुम्ही कोणालाही पाडा’ हा त्यांचा मेसेज मराठा समाजाने गांभीर्याने घेतलेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे Pankaja Munde बीड जिल्ह्यात प्रचार करत असताना काही गावात त्यांना व प्रीतम यांना मराठा समाजाकडून ‘गो बॅक’च्या घोषणा देऊन परत पाठवले जात आहे. हा रोष निवडणुकीत परवडणारा नसल्याची जाणीव असल्याने पंकजा यांनी सर्व मराठा नेत्यांच्या घरी आवर्जुन भेटी देण्याचा धडाका लावला आहे.

राग भाजपवर, फटका पंकजा मुंडेंना Anger on BJP, loss to Pankaja Munde

मुळात पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसींवर अन्याय न होता मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, असेच मत त्या वेळोवेळी व्यक्त करत होत्या. ओबीसी नेते छगन भुजबळ Changan Bhujbal यांच्यासारखी टोकाच्या विरोधाची भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही. पण मग मराठा समाजाचा पंकजा यांना इतका विरोध का आहे? याचे कारण म्हणजे त्या भाजपच्या उमेदवार व ओबीसी नेत्या आहेत.

मराठा समाजाचा असाच तीव्र रोष राहिला तर लोकसभेत पराभूत होण्याची नामुष्की पंकजा यांच्यावर येऊ शकते, अशी शक्यताही आतापर्यंत वर्तवली जात होती. मात्र जसेजसे प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर होऊ लागले तसतशी पंकजांचा आत्मविश्वास बळावू लागला आहे.

ज्योती मेटे कोणाकडून लढणार? From whom will Jyoti Mete fight?

दिवंगत आमदार विनायक मेटे Vinayak Mete यांच्या पत्नी ज्योती मेटे Jyoti Vinayak Mete यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शरद पवार गटातर्फे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मेटे यांनी आयुष्यभर मराठा समाजाच्या हितासाठी लढा दिला. त्यामुळे या काळात संपूर्ण मराठा समाज ज्योती मेटेंच्या मागे उभा राहिल, व त्या पंकजांपुढे तगडे आव्हान उभे करतील, अशी चर्चा होती. मात्र नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनवणे Bajrang Sonwane Ncp’s Candidate यांना पवारांनी उमेदवारी दिली. बजरंग सोनवणे हे सुद्धा पंकजा यांच्यासमोर तगडे स्पर्धक ठरू शकले असते. कारण २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी प्रीतम यांच्याविरोधात ५ लाख ९ हजारांवर मते घेतली होती. पण १ लाख ६९ हजार मतांनी प्रीतम यांनी त्यांचा पराभव केला असला तरी बजरंग सोनवणे यांनी पहिल्याच निवडणुकीत घेतलेली ५ लाखांवरची मते चर्चेचा विषय बनली होती. आता तेच बजरंग सोनवणे पंकजा यांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र एक मोठा फरक आहे. गेल्या वेळी धनंजय मुंडे Dhananjay Munde यांची शक्ती बजरंग यांच्या पाठीशी होती, म्हणून ते इतका मोठा पल्ला गाठू शकले. यावेळी धनंजय यांची ताकद पंकजा यांच्या बाजूने आहे, त्यामुळे बजरंग यांना २०१९ च्या निवडणुकीसारखा प्रतिसाद मिळण्याबाबत साशंकता आहे.

मराठा मतांचे तीन उमेदवारांत विभाजन भाजपच्या पथ्यावर Division of Maratha votes into three candidates in Beed

बरं, संपूर्ण नाराज मराठा समाज सोनवणे यांच्या पाठीशी एकवटला असता तरी पंकजा यांना पराभूत करणे त्यांना शक्य झाले असते. मात्र आता या मतदारसंघात मराठा उमेदवारांची गर्दी वाढत आहे. शरद पवार Sharad Pawar’s NCP गटाकडून उमेदवारी न घेतलेल्या ज्योती मेटे आपल्या शिवसंग्राम पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मेटेंना मानणाराही मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मेटे व सोनवणे या दोघांमध्ये विभाजन होऊ शकते. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीनेही अशोक हिंगे Ashok  Hinges Wanchit Aghadi’s Candidate या तरुण उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. अशोक हिंगे हे मराठा महासंघाच्या सुरुवातीच्या काळापासून विनायक मेटे यांच्यासोबत सावलीसारखे उभे होते. ज्योती मेटे Jyoti Mete यांना वंचितकडून उमेदवार मिळावी म्हणून त्यांनीही खूप प्रयत्न केले, पण मेटे शिवसंग्रामकडूनच लढण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे नाईलाजाने प्रकाश आंबेडकर Praksah Ambedkar यांनी हिंगे यांनाच मैदानात उतरवले. परिणामी या तिघांचेही उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास मराठा समाजाची मते Maratha Voter in beed सोनवणे, मेटे व हिंगे यांच्यात विभागली जातील. तर ओबीसी समाज Obc Voter in beed एकगठ्ठा पंकजा यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. त्यातही पंकजा व धनंजय एकत्र आल्याने वंजारी समाज १०० टक्के पंकजा यांच्या पाठीशी उभा राहिल. तसेच भाजपला मानणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या कार्याने प्रभावित झालेला इतर समाजाचाही मतदार उमेदवार न पाहता डोळे झाकून ‘कमळा’चे बटण दाबेल यात शंका नाही. म्हणूनच सरकारविरोधी रोष असलेल्या मराठा समाजाच्या मतांचे असे विभाजन झाले तर पंकजा यांना विजय सोपा होऊ शकतो. मात्र तर समाजाच्या भावना लक्षात घेऊन बजरंग सोनवणे Bajrang Sonawane, ज्योती मेटे Jyoti Vinayak Mete यापैकी एकाच उमेदवाराच्या नावावर तिघांनीही एकमत केले तर मात्र पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक ठरु शकते, यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics