भाजपची रणनिती : जिथे काठावर यश/ अपयश तिथे दिग्गज उमेदवाराला तिकिट

मुंबई : यंदाच्या लोकसभेला ४०० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट घेऊन निवडणूक रणांगणात उतरलेल्या भाजपने वेगवेगळ्या रणनिती आखल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात अगदी काठावर म्हणजे २ ते ५ टक्क्यांनी विजय मिळवला होता किंवा तितक्याचच मतफरकाने पराभव पत्कारावा लागला  होता त्या ठिकाणी आता दिग्गज उमेदवाराला मैदानात उतरवण्यात येणार आहे. तर जिथे मोठ्या फरकाने म्हणजे २० ते २५ टक्के हून अधिक मतांनी विजय मिळवला होता व जिथे तीन पेक्षा जास्त टर्मचे खासदार आहेत त्या मतदारसंघात आता ‘मोदीच्या गॅरंटी’वर नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्या या निकषांचा विचार केला तर २०१९ च्या निवडणुकीत इतक्या काठावर एकाही मतदारसंघात भाजपला विजय मिळाला नाही की अपयशही आलेले नाही. असे असले तरी महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता व महाराष्ट्र विकास आघाडीच्या एकत्रित आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भाजप सर्वच मतदारसंघात तगड्या उमेदवाराला मैदानात उतरवणार यात शंका नाही.

जालन्यात रावसाहेब दानवे अडचणीत

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (जालना) Raosahen danve यांच्यासारखे ४ ते ५ टर्मपेक्षा अधिक वेळच्या खासदारांना यंदा घरी बसवले जाऊ शकते. केवळ मोदींच्या नावावर जिथे विजयाची खात्री आहे तिथे यावेळी वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या मात्र आजवर निवडणूकीची संधी न मिळालेल्या नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी मिळू शकते. तसेच ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना भाजप यावेळी उमेदवारी देणार नाही हे निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics