सिटीलिंकची बेल आता नव्या ठेकेदाराच्या हाती; नवीन वर्षात लागणार मुहूर्त
सिटीलिंकची बेल आता नव्या ठेकेदाराच्या हाती देण्यात येणार असून, त्यासाठी नवीन वर्षातच मुहूर्त लागणार आहे. सिटीलिंकच्या वाहकांकडून वारंवार आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत.
सिटीलिंकची बेल आता नव्या ठेकेदाराच्या हाती देण्यात येणार असून, त्यासाठी नवीन वर्षातच मुहूर्त लागणार आहे. सिटीलिंकच्या वाहकांकडून वारंवार आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढल्याने सिटीलिंक प्रशासनाने यावर उपाय म्हणून नव्याने शंभर बसेससाठी नवीन निविदा राबविण्यात आली होती.
शंभर बसेससाठी आता वाहकाचे काम नागपूर येथील युनिटी कंपनीला काम दिले जाणार आहे. दरम्यान, या वाहकाला नव्या वर्षाचा मुहूर्त लागणार आहे. रक्कम भरावयाची अट असल्याने प्रारंभी ठेकेदाराकडून टाळाटाळ होत असल्याचे पाहून प्रशासनाने कंपनीला दोनदा स्मरणपत्र पाठविले. यानंतर कंपनीने रकमेतील ५० टक्के म्हणजेच ५० लाखांची रक्कम नुकतीच भरली तर उर्वरित रक्कम लवकरच भरली जाणार आहे. नवीन ठेकेदारामुळे एका ठेक्याची विभागणी होणार आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या आंदोलनाच्या समस्येतून नाशिककरांची सुटका होणार आहे.
सिटीलिंकच्या विद्यमान वाहकांकडून वारंवार आंदोलन केले जात आहे. यामुळे नाशिककर वेठीस धरले जातात. यावर तोडगा म्हणून नवीन ठेकेदाराला एक कोटीची अनामत दसऱ्या ठेकेदाराचा पर्याय घेतला.