धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा गणवेश या डिझायनरने केला डिजाईन

धीरुभाई अंबानी स्कूल ही येथे शिकत असलेल्या स्टार किड्समुळे अधिक चर्चेत असते. येथे ऐश्वर्याच मुलगी, सैफ अली खानचा मुलगा, शाहरुख खानचा मुलगा तसेच इतर अनेक सेलिब्रिटींची मुले देखील शिकतात. या शाळेच्या प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. आता धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा गणवेश कोणी डिजाईन केला आहे पाहा.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल जेथे बॉलीवूड सेलिब्रिटी, आयएएस अधिकारी तसेच प्रसिद्ध उद्योगपतींची मुले शिकतात. जगातील काही विशेष शाळांमध्ये या शाळेचा क्रमांक लागतो. या शाळेत अनेक मोठ्या लोकांची मुले शिकतात. आराध्या बच्चन पासून अबराम खान पर्यंत अनेक सेलिब्रिटींची मुले या शाळेत शिकत आहेत. या शाळेची फी देखील तितकीच महाग आहे. काही दिवसांपूर्वीच शाळेच्या वार्षिक संमेलनाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर ही शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

नेटिझन्सना या शाळेची फी, शिक्षकांचे पगार जाणून घ्यायला आवडलेच पण आता या शाळेचा गणवेश कोणी डिजाईन केला आहे. याबाबत ही चर्चा होत आहे. शाळेचा गणवेश हा इतर कोणी नसून उत्कृष्ट डिझायनर मनीष मल्होत्राने डिजाईन केला आहे. येथील विद्यार्थी शाळेच्या गणवेशात अजून छान दिसतात.

नीता अंबानी यांनी या शाळेचा स्तर उच्च ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे प्रभावशाली शैक्षणिक प्रवासाचे केंद्र बनले आहे.

2003 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सात मजले असून ती 1,30,000 चौरस फूट परिसरात पसरलेली आहे. येथे मुलाेंच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. भारतीय संस्कृती देखील येथे शिकवली जाते. शाळेचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी येथील प्रत्येक गोष्टीवर विशेष लक्ष दिले गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics