उद्धव ठाकरेंचे पद बेकायदा, मग त्यांचा उमेदवारी अर्ज, एबी फॉर्म कसा चालतो?
मुंबई : आधी निवडणूक आयोगाने व आता विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व भाजपच्या इशाऱ्यावर चाललेले षडयंत्र आहे, असा आरोप खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांच्यासह ठाकरे गटाचे नेते करत आहेत. शिंदे गटाने तर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचे पक्षप्रमुख पदच बेकायदा असल्याचा युक्तिवाद विधानससभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत केला. अध्यक्षांनीही तो मान्य करत शिंदेंना शिवसेनेचे सर्वेसर्वापद बहाल केले.
या प्रकारामुळे प्रचंड संतापलेल्या ठाकरे गटाने आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या जुन्या भूमिकांची आठवण करुन दिली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातून एबी फॉर्म घेताना शिंदेंनी (Eknath Shinde) एक ट्विट (twitt) करुन पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांचे आभार मानले होते. हे ट्विट आता व्हायरल (viral) होत आहे.
अंबादास दानवे याची टीका
ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, ‘२०१९ मध्ये विधानसभेचा एबी फॉर्म घेताना शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेतील घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकाधिकारशाही दिसली नाही का? हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करुन गेला आाणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का?’ असा प्रश्नही दानवेंनी उपस्थित केला.