Govindas-entry-on-the-screen-of-politics-is-only-due-to-economic-crisis
मुंबई: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचे actor Govinda पुन्हा राजकारणात पदार्पण झालंय. त्याने नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. Bollywood actor Govinda in shiv sena खरं म्हणजे गोविंदांसारखे अनेक स्टार्स बॉलीवूडमधील आपली लोकप्रियता ओसरू लागताच आता राजकारणाचा रस्ता धरु लागतात. पण गोविंदाची ही राजकारणातील दुसरी टर्म आहे. यापूर्वी बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी चर्चेत असताना २००४ मध्ये त्याने उत्तर मुंबईतून भाजपचे ज्येष्ठ नेते व तत्कालिन केंद्रीय मंत्री असलेल्या राम नाईक BJP Leader Ram Naik यांचा पराभव केला होता. तब्बल ५ टर्म खासदार राहिलेल्या नाईकांना हरवणे तशी सोपी गोष्ट नव्हती. गोविंदाकडे तसा राजकारणाचा काही अनुभवही नव्हता. मात्र तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर, आपल्या लोकप्रियतेच्या बळावर त्याने ही निवडणूक जिंकली होती. नंतर मात्र ५ वर्षे तो या मतदारसंघासाठी फारसे काही कामे करु शकला नाही अन् २००९ मध्ये खासदारकीची टर्म पूर्ण झाल्यानंतर त्याने पुन्हा राजकारणाला टाटा- बाय बाय करत बॉलीवूडचा रस्ता धरला होता. सुमारे १५ वर्षे तो तिकडेच रमला.
आता गोविंदाला पुन्हा राजकारणाचा पडदा का खुणावू लागला? याचे कारण शोधण्याचा आपण प्रयत्न करु या…
गेल्या काही वर्षांपासून गोविंदाची Actor Govinda बॉलीवूडमधील लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे. त्याचा एकही चित्रपट पडद्यावर आली नाही, अपवादात्मक एखादा आलाही असेल तर तो चाललेला नाही. त्यामुळे रसिकांच्या आठवणीतून तो बाजूला पडला आहे. दुसरीकडे चित्रपटच हाती नसल्याने पैशाचीही चणचण जाणवत असल्याचे बॉलीवूडमधील त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
आपल्या मुलीलाही बॉलीवूडमध्ये सेट करण्याचे आव्हान गोविंदासमोर आहे. त्यासाठीही मोठा खर्च उचलावा लागणार आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर पुन्हा राजकारणात प्रवेश करणे हा एकमेव मार्ग गोविंदला दिसला. म्हणूनच लोकसभा निवडणुकीची संधी साधून ‘छोटे मियां’ने पुन्हा राजकारणात एन्ट्री घेतल्याचे सांगितले जाते.
Govindas-entry-on-the-screen-of-politics-is-only-due-to-economic-crisis
गोविंदाने शिवसेना का निवडली?
खरं तर गोविंदाने आधी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस नेत्यांमार्फत राहूल गांधी Rahul Gandhi यांच्याशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीत आपण प्रचाराचे काम करु, त्या बदल्यात मला उत्तर मुंबईतून उमेदवारी द्या, अशी अपेक्षा त्याने राहुल गांधींपर्यंत पोहोचवली. पण आता ही जागा काँग्रेसच्या कोट्यात राहिलेली नाही. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यात आपण हतबल असल्याचा निरोप राहूल गांधींकरवी गोविंदांपर्यंत पोहोचवण्यात आला. याचे कारण म्हणजे आता काँग्रेस हा पक्ष शरद पवार Sharad Pawar यांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांची शिवसेना या पक्षांसोबत आघाडीत आहे. जागावाटपाच्या सूत्रानुसार, उत्तर मुंबईची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे आपण इतर कुणालाही कमिटमेंट देऊ शकत नाहीत, असे राहूल गांधींनी आधीच स्पष्ट करुन टाकले. तसेच उत्तर मुंबईतून लढायचेच असेल तर उद्धव ठाकरेंशी संपर्क साधा, असा सल्लाही गोविंदाला त्यांच्याकडून देण्यात आला.
राहूल गांधींच्या नकारानंतर ठाकरेंशी संपर्क
मग, गोविंदाने आपल्या हितचिंतकांमार्फत उद्धव ठाकरेंपर्यंत असाच प्रस्ताव पाठवला. पक्षफुटीमुळे आधीच उद्धव Udhav Thackeray ठाकरेंचा पक्ष विस्कळीत झाला आहे. ते आपल्याला स्टार प्रचारक म्हणून निवडतील, बक्कळ मानधनही देतील. शक्य झाले तर उमेदवारीची लॉटरीही लागू शकेल, अशी आशा गोविंदाला होती. पण उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. एेनवेळी एखाद्या स्टारला उमेदवारीत देऊन निष्ठावान शिवसैनिकांवर आपण अन्याय करु शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट कळवले. त्यामुळे गोविंदाचा हा रस्ताही बंद झाला.
शिंदेंनी स्वीकारला प्रस्ताव
अखेरचा पर्याय म्हणून त्याने एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेशी संपर्क साधला. उद्धव ठाकरेंशी बंड करुन शिंदेंनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली असली तर अजूनही त्यांना मुळ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. हे केवळ विरोधकच म्हणत नाहीत तर शिंदेसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या सर्व्हेक्षणा अहवालातही हे निष्कर्ष समोर आले आहेत. या वास्तवाची शिंदेंनाही जाण आहे. म्हणूनच लोकसभा, विधानसभा व आगामी मुंबई मनपा निवडणुकसाठी गोविंदाच्या रुपाने एक स्टार प्रचारक आपल्या हाती लागतोय, ही संधी सोडू नये असा निर्णय त्यांच्या कोअर टीमने घेतला. महाराष्ट्राची सत्ताच हाती असल्याने मानधनाबाबत खळखळ न करता त्यांनी गोविंदाला ‘असाईन’ केले. उमेदवारी मिळो अथवा न मिळो, स्टार प्रचारकाचे काम मात्र आपल्यालाच हवे, या अटीवर त्याने भगवा हाती घेतला. त्यामुळे शिंदे गटातही चैतन्य निर्माण झाले आहे.
दाऊदशी संबंधाचे गोविंदावर भाजपकडून आरोप Govinda accused of having relationship with Dawood
गोविंदाचा पूर्वीचा राजकीय इतिहास पाहिला तर २००४ मध्ये त्याने ज्यांना पराभूत केले होते ते भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना २०१६ मध्ये नाईक यांनी ‘चरैवेति, चैरेवेति’ हे एक पुस्तक लिहिले. त्यात आपल्या राजकीय आयुष्याच्या आठवणींना उजाळा दिला होता. २००४ च्या निवडणुकीतील आपल्या पराभवाचे विश्लेषण करताना राम नाईक यांनी गोविंदाचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. दाऊदच्या मदतीने व वसई- विरारचे भाई हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने गोविंदाने आपला पराभव केल्याचे नाईक यांनी या पुस्तकात नमूद केले होते. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. राष्ट्रद्रोह करणाऱ्यांना कधीही पाठीशी न घालण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आता गोविंदासारखा दाऊदशी संबंधाचा आरोप असलेला अभिनेता आपल्या महायुतीत कसा चालतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नवाब मलिकांना विरोध, मग गोविंदा कसा चालतो?
यापूर्वी दाऊदशी संबंधाच्या आरोपावरुन राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक Nawab Malik तुरुंगात जाऊन आले. ते जामिनावर बाहेर आल्यानंतरही अजित पवारांच्या पक्षात येणार नाहीत, म्हणजे पर्यायाने महायुतीचा भाग बनणार नाहीत याची काळजी भाजपने कटाक्षाने घेतली होती. मग राम नाईक यांच्यासारख्या भाजपच्याच नेत्याने ज्यांच्यावर दाऊदशी संबंधाचा आरोप केला तो गोविंदा महायुतीचा स्टार प्रचारक कसा काय होऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर उद्या भाजपलाही द्यावे लागणार यात शंका नाही.