आमच्या काळात बंड नव्हत. आम्ही बसून निर्णय घ्यायचो, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी काळजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अामचे बंड नव्हतं अाम्ही यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.
गेली १० ते १५ वर्ष बारामती आणि त्या भागात मी लक्ष दिले नसल्याचे नमूद करीत पवार म्हणाले, ‘‘साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबदारी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही. त्यामुळे कुणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही. परिसराचा नाव लौकिक वाढेल याची काळजी घ्यावी. कुणी कुणाचं ऐकावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे.
कुस्ती परिषदेबाबत निर्णयास विलंब
क्रीडा मंत्रालायने भारतीय कुस्ती परिषदेची नवी बॉडी निलंबित करण्यास उशीर केला. त्यांनी यापूर्वीच हे करायला हवे होते. ज्या महिला खेळाडूंनी भारताचा सन्मान वाढवला. त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. यापूर्वीच भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.