“ते येवल्याचं येडपट! त्याला म्हणालो होतो आमच्या वाटेला जाऊ नको; त्यानेच त्याच्या पाहुण्यांची घरं जाळली; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर खरमरीत टीका

मनोज जरांगे यांची बीडमध्ये मोठी जंगी सभा पार पडली. या सभेतून मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत, सरकारला इशारा दिला आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या मागील वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत त्यांना इशारा दिला आहे. छगन भुजबळांवर टीका करताना, बीडमधील हा विशाल जनसमुदाय पाहिला तर छगन भुजबळांना हगवण लागल्याशिवाय राहणार नाही, असा उपरोधिक टीका केली. त्यानंतर आमच्या वाटेला न जाण्याचा स्पष्ट इशाराच दिला. आयचं येडपटं बुजगावणे कुठले, तू थांब एकदा, आरक्षण मिळूदे, तुला कचकाच दाखवतोअसा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यभर मनोज जरांगेंचे यांचे दौरे सुरू आहेत. सध्या मराठवाड्यात मनोज जरांगें यांचे दौरे आहेत. बीडमधील सभेतून मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. यामध्ये कोणीही हिंसाचार न करता हे आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. हे ब्रह्मास्त्र सरकारला सुद्धा पेलता येणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचेच नाही, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

निष्पाप पोरांना गुतवण्याचे षडयंत्र सरकारने केले. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी होती. मनोज जरांगेंची बीडमधून मराठा आरक्षणावरून सभा. ते ‘येवल्याचे येडपट’ आमच्या वाटेला जाऊ नको म्हणालो होतो. मला गिरीश महाजनांनी सांगितले होते, तुम्ही त्यांच्यावर बोलू नका. मी त्यांना सांगितले होते. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध कोणी जात असेल तर त्याला सोडणार नाही. आरक्षण मिळू दे, तुला दाखवतो कचका कसा असतो. हे कळून घेना हे मराठे कशासाठी येथे आले आहेत. भुजबळ मला आता साहेब म्हणू लागले आहेत.

तुमचा राजकीय अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. नवनवीन प्रयोग राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केला आहे. आता सावध व्हा. मराठा समाज आता एकत्र आलाय. ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या. त्याचे ऐकून तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. आता जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे. आधी समाज आणि नंतर मग घर. हा मराठा समाजाच माझा मायबाप आहे. मी या समाजाशी गद्दारी करायला आंदोलन केला नाही. ही तर आर्ध्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. मायबाप तुमची एकजुटीची ताकद जिवंत असेल तोपर्यंत वाया जाऊ देणार नाही. माझ्यासाठी आधी समाज, नंतर माझं कुटुंब.