Lok Sabha Election 2024 बारामती म्हणजे पवारांचा सातबारा नाही; शिवतारे मैदानात

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीत मोठा ट्विस्ट supriya sule sunetra pawar

Lok Sabha Election 2024 पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आजतागायत शरद पवार यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात यावेळी पवारांची कन्या व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार sunetra pawar या उमेदवारी दाखल करणार आहेत. घरातूनच आव्हान मिळाल्यामुळे दस्तुरखुद्द शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. मात्र या संभाव्य लढतीत अजून एक ट्विस्ट आला आहे. पुरंदरचे माजी आमदार व शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजयबापू शिवतारे यांनीही तिसरा उमेदवार म्हणून बारामतीत लढण्याची घोषणा केली आहे.

अजित पवारांच्या दादागिरीला कंटाळून गेले होते सेनेत

विजय शिवतारे व अजित पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले शिवतारे अजित पवारांच्या दादागिरीला कंटाळून शिवसेनेत आले होते. २००९ व २०१४ च्या निवडणुकीत पुरंदर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. ही टीका जिव्हारी लागल्यामुळे अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवतारे यांना पराभूत करण्याचा विडाच उचलला होता.

तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते?

‘तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही,’ असा जाहीर इशारा अजितदादांनी तेव्हा दिला होता आणि तो खराही करुन दाखवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या पाठीमागे अजित पवार यांनी ताकद उभी केली, त्यामुळे शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. तो शिवतारेंच्या खूप जिव्हारी लागला. शिवसेनेत फुटीनंतर शिवतारे शिंदे गटासोबत गेले. आता बारामतीत दोन्ही पवारांमध्ये लढाई होत असताना त्यांनीही या लढाईत उडी घेण्याची घोषणा केली आहे.

बारामतीत विजय आपलाच

बारामती मतदारसंघ काही पवारांचा सातबारा नाही. या मतदारसंघात फक्त बारामतीचाच नेता निवडून यावा असा नियम नाही. भोर, पुरंदर येथील उमेदवारही येथून निवडून येऊ शकतो. गेल्या निवडणुकीचा विचार केला तर पवारांच्या बाजूने ६ लाख ८३ हजार मते आहेत. तर पवारांच्या विरोधात ५ लाख ८० हजार मते आहेत. यावेळी ६ लाख ८३ हजार मतांचे दोन्ही पवारांमध्ये विभाजन होईल. मात्र पवारविरोधी ५ लाख ८० हजार मते एकगठ्ठा राहिली तर आपला उमेदवार विजयी होऊ शकतो.

https://missionpolitics.com/vijay-shivtares-challenge-to-pawar-in-baramati-lok-sabha/

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics