मुंबई : काँग्रेस, शरद पवार sharad pawar यांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंची udhhav thakre शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजून संपलेले नाही. प्रकाश आंबेडकर prakash ambedkar यांच्या वंचित बहुजन आघाडीने अद्याप आघाडीत यायचे की नाही याबाबत संभ्रम कायम ठेवल्याने पेच अधिक वाढत चालला आहे. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी rahul gandhi हे १२ ते १७ मार्चदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते त्यात व्यस्त असल्यामुळे १७ मार्चपर्यंत मविआचे जागावाटप होणार नसल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र निर्णयाची वाट न पाहता आपल्या पक्षाचे ८ उमेदवार परस्पर जाहीर करुन त्यांना तयारीला लावण्याचे आदेशही दिले आहेत. यात दक्षिण मुंबई, ठाणे, धाराशिव व परभणी येथील चार विद्यमान खासदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ आहेत. त्यापैकी उद्धव सेनेला २३, काँग्रेसला १५ व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा देण्याची प्राथमिक चर्चा तिन्ही पक्षांमध्ये झाली. वंचित बहुजन आघाडीला उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून ३ जागा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र प्रकाश आंबेडकर ७ जागांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाची गाडी मध्येच अडकून पडली आहे.
राहूल गांधी घेणार अंतिम निर्णय
Rahul Gandhi will take final decision
आता १२ ते १७ मार्चपर्यंत राहूल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. १७ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत ते मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. याच दौऱ्यात राहूल गांधी ठाकरे, पवार, प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करुन जागावाटपावर शिक्कामोर्तब करतील. ते मुंबईतून निघून गेल्यानंतर हे जागावाटप अधिकृतपणे जाहीर केले जाईल व नंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे संकेत दिले जात आहेत.
उद्धव ठाकरेंकडून सहा उमेदवार जाहीर
Six candidates announced by Uddhav Thackeray
महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झाले नसले तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र गतीने कामाला लागली आहे. ठाकरेंनी मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात दौरे सुरु केले आहेत. तसेच पक्षप्रवेशही वाढत आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचे ६ उमेदवारांची नावेही मेळाव्यातून जाहीर केली आहेत.
- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. शिंदे सेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे ते पूत्र आहेत. किर्तीकर गेल्या वेळी याच मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र पक्षफुटीनंतर ते शिंदेंसोबत गेले मात्र त्यांचे पूत्र अमोल ठाकरेेंसोबत राहिले. म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली.
- सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकताच उद्धव सेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी त्यांना लगेच उमेदवारीही जाहीर केली. चंद्रहार हे आधी वंचितकडून इच्छूक होते. मात्र त्यांचा मविआत येण्याबाबत निर्णय रखडल्याने त्यांनी थेट ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारुन उमेदवारी मिळवली.
- दक्षिण मुंबईत अरविंद सावंत तर ठाण्यात राजन विचारे हे उद्धव सेनेचे विद्यमान खासदार आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यांनाही आधीच ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली.
- ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दीना पाटील यांचे नाव ठाकरेंनी जाहीर केले. राष्ट्रवादीत असताना पाटील हे या मतदारसंघातून निवडून आले होते. आता ते उद्धव सेनेत दाखल झाले आहेत.
- पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांचे नाव ठाकरेंनी जाहीर केले.
- धाराशिवमधील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर व परभणीचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचे नावही ठाकरेंनी निश्चित केले आहे.
संभाजीनगरातून चंद्रकांत खैरेही लागले तयारीला
Chandrakant Khaire from Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून यापूर्वी ४ वेळा निवडून अालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच खैरे यांनी संपर्क कार्यालयही सुुरु केले असून १३ मार्च रोजी या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे.
https://missionpolitics.com/chhatrapati-sambhajinagar-bjp-lok-sabha-candidate-vinod-patil/
ठाकरेंच्या निर्णयावर भडकले संजय निरुपम
Sanjay Nirupam got angry at Thackeray’s decision
महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमाेल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसेचे नेते संजय निरुपम मात्र चांगलेच भडकले आहेत. अद्याप कोणती जागा कोण लढवणार हे ठरलेले नसताना ठाकरेंनी परस्पर उमेदवारांची नावे जाहीर करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निरुपम स्वत: या मतदारसंघासाठी फिल्डींग लावून बसले होते, मात्र किर्तीकरांमुळे त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे ते चिडले आहेत. सोशल मीडियावर संजय निरुपम म्हणतात, ‘अमोल किर्तीकर यांची खिचडी घोटाळ्यात ईडीकडून चौकशी सुरू असताना, अशा उमेदवाराचा काँग्रेसचे कार्यकर्ते कसा प्रचार करणार?’