मित्रपक्षालाही आपल्या तालावर नाचवणाऱ्या अमित शाह यांना एकनाथ शिंदेंनी दिला शह
केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर करुनही संभाजीनगर, नाशिकची जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
Loksabha election 2024- Eknath Shinde’s chck to Amit Shah
मुंबई : शिवसेनेत फूट पाडण्यापासून ते उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार करण्यापर्यंत, एकनाथ शिंदेंना Eknath Shinde मुख्यमंत्री बनवण्यापासून ते अजित पवारांनाही Ajit Pawar महायुतीत सामील करुन घेण्यापर्यंत महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याचे कर्तेधर्ते केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shah आहेत हे आता लपून राहिलेले नाहीत. महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपातही त्यांचाच शब्द अंतिम असल्यामुळे शिंदे- फडणवीस- अजित पवारांना वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या. एनडीएतील मित्रपक्षांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या अमित शाह यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र शह देऊन दोन मतदारसंघात शहा यांचे आदेश धुडकावून लावले आहेत.
अचानक मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागल्यापासून एकनाथ शिंदे Eknath Shinde हे मोदी- अमित शाह यांचे नेहमी तोंड भरुन कौतुक करत असतात. त्यामुळे ते आता भाजपची स्क्रिप्टच वाचू लागले आहेत, असा आरोप शिदेंचे विरोधक सातत्याने करत असतात. भलेही मुख्यमंत्री शिंदे असले तरी महत्त्वाचे निर्णय हे देवेंद्र फडणवीस सांगतील तसेच घेतात, असेही काही अनुभव महाराष्ट्राने घेतलेले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरु असताना भाजप ३२ जागा लढवेल व शिंदे- अजित पवार यांच्या वाट्याला प्रत्येकी ६-६ जागा येतील अशीच चर्चा होती. मात्र आपल्या पक्षाकडे १३ खासदार असल्यामुळे त्यापेक्षाही एकही जागा कमी घेणार नसल्याचे शिंदे ठणकावून सांगत होते. अमित शाह Amit Shah यांच्यापुढे शिंदेंचा हा निर्धार टिकणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत होते, पण तसे खोटे ठरले.
Loksabha election 2024- Eknath Shinde’s chck to Amit Shah
४ खासदारांना बदलावे लागल्याने शिंदेवर पक्षातून दबाव
जागावाटपाची चर्चा जेव्हा दिल्लीत गेली तेव्हा शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले की, बंडात मला साथ देणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला मी डावलू शकत नाही. त्यामुळे लोकसभेच्या किमान १३ जागा तरी शिवसेनेला मिळायलाच हव्यात. मोदी- शाह यांनीही शिंदेंचा हा युक्तिवाद मान्य केला. मात्र ‘अँटी इन्कम्बन्सी’ असलेले ५ खासदार बदलावे लागतील, अशी अट शाह यांनी घातली. शिंदेंनी हा निर्णय स्वीकारण्यासही सुरुवातीला नकार दिला, मात्र विद्यमान खासदार हा निकष ठेवण्यापेक्षा विजयी होण्याची क्षमता हा निकष ठेऊनच निर्णय घ्या, असा आदेश दिल्लीतून आल्यामुळे नाईलाजास्तव शिंदेंना गजानन किर्तीकर Gajanan kirtikar, कृपाल तुमाने Krupal Tumane, हेमंत पाटील Hemant Patil, भावना गवळी Bhawana Gavli या चार खासदारांचे तिकिटे कापावी लागली. मात्र शिंदेंच्या या निर्णयामुळे त्यांच्या पक्षात अस्वस्थता निर्माण झाली. लोकसभेचा हा पॅटर्न भाजप दबावाचे राजकारण करुन विधानसभेलाही राबवू शकते, त्यामुळे आता दिल्लीसमोर झुकू नका, असा आग्रह शिंदेंच्या पक्षातून होऊ लागला. विशेषत: आमदार, मंत्र्यांकडून सातत्याने ही मागणी एकनाथ शिंदेंकडे होऊ लागली. त्यानंतर मात्र शिंदेंनी ताठर भूमिका घ्यायला सुरुवात केली.
अमित शाह यांच्यावर आदेश मागे घेण्याची नामुष्की
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, कल्याण, ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. संभाजीनगरात तर अमित शाह यांनी जाहीर सभा घेऊन इथून भाजपचाच उमेदवार उभा राहिल व जिंकूनही येईल, अशी घोषणा केली होती. नाशिकमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ Changan Bhujbal यांना उमेदवारी दिली तरच ते जागा युतीला जिकंता येईल, असे निष्कर्ष काढून भुजबळांनाच उमेदवारी द्या, असे फर्मानही शाह यांनी काढले होते. मात्र काहीही झाले तरी जिथे आपले खासदार त्या जागा सोडायच्या नाहीत, या निर्णयावर शिंदे गट ठाम राहिला. नेत्यांच्या दबावामुळे शिंदेंनीही ही बाब अमित शाह Amit Shah यांना पटवून दिली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी तर नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे Hemant Godse हेच आमचे उमेदवार असतील, हे सभेमधून ठणकावून सांगितले. गोडसेंच्या उमेदवारीसाठी शिंदे पिता-पूत्रासह सर्वांनीच प्रतिष्ठा पणाला लावली. अखेर शिंदेंच्या निर्धारापुढे अमित शाह यांनाही आपला निर्णय मागे घ्यावा लागला. संभाजीनगर व नाशिकची जागा शिंदेसेनेकडेच राहिली.
ठाणेही सोडणार नाही, शिंदेंचा निर्धार
ठाणे, कल्याण व मुंबईतील तीन जागांवर अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हेच उमेदवार राहतील, असे देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनीही जाहीर केले आहे. मात्र तरीही अद्याप शिंदे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. याचे कारण म्हणजे कल्याण शिंदेसेनेकडे ठेऊन भाजप ठाणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी रणनिती आखत आहे. मात्र ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा व शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ राखणे शिंदेंसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. म्हणूनच काहीही झाले तरी मुंबईच्या तीन जागा व ठाणे- कल्याण शिवसेनेकडेच राहिल, यासाठीही शिंदे यांनी भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी आपला पक्ष १६ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे शिंदेंकडे असलेल्या १३ खासदारांपेक्षा ३ अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत, असेच यावरुन दिसून येते.