देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांचा विरोध डावलून एकनाथ खडसेंना भाजप पुन्हा घेणार पक्षात

दिल्लीतील नेत्यांच्या आदेशावरुन ८ दिवसात होऊ शकते घरवापसी

Loksabha election-Eknath Khadse will come to Bjp again
जळगाव :
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‌ Devendra Fadanvis यांच्यावर नाराज होत शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse साडेतीन वर्षांनी पुन्हा भाजपात येण्याच्या तयारीत आहेत. खरं तर स्वत: देवेंद्र फडणवीस व त्यांचे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांचा नाथाभाऊंच्या घरवापसीला विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारुन भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी खडसेंची भाजपात परत येण्याची विनंती मान्य केली असल्याची खात्रिलायक माहिती आहे. येत्या आठ दिवसांत त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
Loksabha election-Eknath Khadse will come to Bjp again
उभी हयात भाजपात घालवलेले एकनाथ खडसे यांची राज्यात पक्षाची सत्ता आल्यानंतर मात्र उपेक्षा झाली. २०१४ पर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर असताना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारला जाब विचारणारे आक्रमक नेते म्हणून त्यांची विधिमंडळात ओळख होती. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्यानंतर भाजपमधील आक्रमक ओबीसी नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाला अन इथूनच खडसे यांचे राजकीय ग्रह फिरले.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis ज्युनिअर असूनही त्यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्याचा पक्षनेतृत्वाचा निर्णय खडसेंना मंजूर नव्हता. सुरुवातीला त्यांनी तशी नाराजीही बोलून दाखवली, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने अखेर नाईलाजाने त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची तयारी दर्शवली. महसूल मंत्री हे महत्त्वाचे खाते त्यांना देण्यात आले. मात्र दोनच वर्षात त्यांचे हे मंत्रिपद भोसरी भूखंड घोटाळ्यामुळे अडचणीत आले.

काय आहे भोसरी भूखंड घोटाळा? What is Bhosari Land Scam

महसूल मंत्री असताना २०१६ मध्ये खडसे Ekanath Khadse यांनी पुण्याजवळील भोसरी येथील एमआयडीसीचा ३ एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी Mandakini Khadse व जावाई गिरीश चौधरी Girsih Chaudhari यांच्या नावे खरेदी केला. बाजारभावाप्रमाणे ४० कोटी किंमत असलेला हा भूखंड खडसे यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत ३.७५ कोटीत खरेदी केला, अशी तक्रार दाखल झाली होती. सुरुवातीला एसीबीने या तक्रारीत काही तथ्य नसल्याचे सांगत क्लोजर रिपोर्ट सादर करुन खडसेंना क्लीनचिट दिली. मात्र नंतर तक्रारदाराने पुन्हा कोर्टात धाव घेतल्याने या प्रकरणाची पुन्हा चौकशी लागली. विरोधी पक्षांनीही हे प्रकरण उचलून धरले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadavnvis यांनी खडसे यांना  मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. इथूनच खडसे व फडणवीस यांच्यातील अंतर वाढत गेले. आपल्यावरील कारवाईमुळे खडसे फडणवीसांवर जाहीर टीका करु लागले.

विधानसभेचे तिकीट कापल्याने राष्ट्रवादीत Eknath Khadse in NCP

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. ज्या पक्षासाठी आयुष्य खर्ची घातले त्याच पक्षाने आपली उमेदवारी कापावी हा राग खडसेंना होता. त्यांनी पुन्हा फडणवीस यांना त्यासाठी जबाबदार मानून जोरदार टीका सुरु केली. पक्ष पक्षनेतृत्वाचा निर्णय काही बदलला नाही. दरम्यान, या निवडणुकीत खडसेंच्या कन्येचाही शिवसेनेच्या बंडखोराकडून पराभव झाला. त्यामुळे खडसे अधिकच चिडले. आता भाजपमध्ये आपल्याला काही भवितव्य राहिले नाही असे समजून त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांनी तातडीने त्यांना विधान परिषदेवर आमदारही केले. तेव्हा राज्यात उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना मंत्रिपदाची संधी देण्याचाही पवारांचा विचार होता. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरेंचे सरकार कोसळले व खडसे यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीतही फूट पडली, मात्र खडसे शरद पवारांसोबतच राहिले.

आता पुन्हा भाजपची ओढ  BJP’s attraction again to Khadse

जळगावातील भाजपचे नेते व फडणवीस यांचे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन व खडसे यांच्यात राजकीय वैर आहे. खडसे भाजपातून निघून गेल्यानंतर महाजन यांचे जिल्ह्यात व पक्षात वजन वाढले. त्यामुळे खडसेंना पुन्हा पक्षात घेण्यास महाजन यांचा विरोध आहे. फडणवीसही फारसे अनुकूल नाहीत. मात्र खडसे यांचे थेट दिल्लीतील नेत्यांशी संबंध असल्याने त्यांनी यांना न विचारता थेट पक्षश्रेष्ठींशी संधान साधून भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

खडसे राष्ट्रवादीत असले तरी त्यांच्या सुनबाई व रावेरच्या खासदार रक्षा Raksha Khadse खडसे भाजपात कायम राहिल्या. येत्या लोकसभा निवडणुकीत एकतर रक्षा राष्ट्रवादीत येतील नाही तर खडसे भाजपात जातील, अशी चर्चा होती. त्यामुळे रक्षा यांना भाजप तिकीट देईल का? अशीही शंका होती. मात्र भाजपने रक्षा यांना पुन्हा रावेरमधून लोकसभेचे तिकीट दिले. तिथेच एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले. रक्षा यांना विजयी करण्यासाठी खडसेंना भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही. तसेच मुलगी रोहिणी Rohini Khadse यांनाही राजकारणात सेटल करण्यासाठी त्यांना भाजपची गरज आहे. सध्या नाथाभाऊ प्रकृती अस्वास्थामुळे त्रस्त आहेत. मात्र अजूनही त्यांची जळगावसह खान्देशावर चांगली पकड आहे. त्यांच्या या जनसंपर्काचा भाजपलाही फायदा करुन घ्यायचा आहे. या दोन्हीकडच्या गरजामुळे खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जाते.

विनोद तावडे ठरले तारणहार vinod Tawde’s help important For Khadse

भोसरी भूखंड घोटाळ्यात अडकल्यापासून भाजपच्या एका गटाने एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्याविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे कानभरणी सुरु केली होती. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे तर या गटाच्या हाती खडसेंना पुन्हा भाजपची दारे न उघडण्यासाठी आयते कोलितच मिळाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे स्वत:च्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत, हे वारंवार सांगून खान्देशात आता त्यांची लोकप्रियता घटू लागल्याचे हा गट दिल्लीश्वरांना सांगत होता. मात्र या काळात खडसेंची बाजू पक्षनेतृत्वाकडे भक्कमपणे मांडत होते ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे Vinod Tawde. त्यांच्या प्रयत्नांमुळे खडसे यांच्यासाठी भाजपने पुन्हा आपले दरवाजे उघडण्याची तयारी दर्शवली आहे. Bjp Open Doors For Eknath Kadse.  चार- आठ दिवसांत ते प्रत्यक्षात येईलही. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांपेक्षा तावडेंचा दिल्लीत वजन वाढले असल्याची प्रचिती महाराष्ट्राला आल्याशिवाय राहणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics