जे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिवारवादा’वर टीका करतात त्यांचाच भाजपा घराणेशाहीतून उमेदवार देण्यात अव्वल
महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रमुख ८६ उमेदवारांपैकी ३० जण घराणेशाहीतून त्यातही सर्वाधिक १२ भाजपचे, सर्वात कमी काँग्रेसचे ४ उमेदवार
Loksabha election-familism in Maharashtra Politics
मुंबई : परिवारवादामुळे भारतीय राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. इंडिया आघाडीतील सर्वच प्रादेशिक पक्ष व काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष घराणेशाहीत अडकला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi प्रत्येक भाषणात करत असतात. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या ८६ प्रमुख उमेदवारांच्या नावावर नजर टाकली असता त्यापैकी ३० उमेदवार हे घराणेशाहीतून आले असल्याचे स्पष्ट होते. यातून मोदींनी केलेली टीका खरीही वाटते. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे मोदी घराणेशाहीवर वारंवार प्रहार करतात त्यांच्याच भाजप पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक १२ मतदारसंघातील उमेदवार हे घराणेशाहीतून दिले आहेत. त्याखालोखाल उद्धव सेनेचे ७, काँग्रेसचे ४ व शिंदेसेनेचेही ४ उमेदवार हे घराणेशाहीचा वारसा चालवत लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. familism in Maharashtra Politics
चला तर आपण पाहू या… कोणकोणते उमेदवार घराणेशाहीचा वारसा घेऊन निवडणूक लढवत आहेत….
Loksabha election-familism in Maharashtra Politics
भाजपचे २४ पैकी १२ म्हणजे सुमारे ५० % उमेदवार हे घराणेशाहीतून आले आहेत.
1.बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे Pankaja Gopinath Munde या दिवंगत उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या.
2. दक्षिण अहमदनगरचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील Dr. Sujay Radhakrushn vikhe patil हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते व आता भाजपचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र. सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री होते.
3. जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे Raksha Khadse या ज्येष्ठ नेते व मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत.
4. नंदूरबारच्या उमेदवार डॉ. हिना गावित Dr. Heena Vijaykumar Gavit या भाजपचे कॅबिनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या कन्या
5. धुळ्याचे डॉ.सुभाष भामरे Dr. Subhash Bhamre हे आमदार गोजरताई भामरे यांचे पुत्र आहेत.
6. साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले Udyan raje Bhosle हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असून त्यांचे काका अभयसिंह राजे यांच्या प्रेरणेतून उदयनराजे राजकारणात आले. त्यांचे एक बंधू शिवेंद्र राजेही आमदार आहेत.
7. माढ्याचे वादग्रस्त उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjeetsingh Naik Nimbalkar हे साताऱ्याचे माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचे पुत्र आहेत.
8. अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे हे सध्याचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. वडिल गंभीर आजारी असल्याने अनुप यांना पक्षाने उमेदवारी दिली.
9. अमरावतीच्या बहुचर्चित उमेदवार नवनीत राणा या भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत.
10. दिंडोरीच्या उमेदवार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या सुनबाई आहेत. ए.टी. पवार हे तब्बल ९ वेळा आमदार होते.
11. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांचे वडील पंचायत समिती सभापती होते तर सासरे २५ वर्षे सरपंच होते. स्मिता यांचे दिवंगत पती उदय वाघ हे भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष होते.
12. उत्तर मुंबईतील उमेदवार व केंद्रीय मंत्री पीयूष गाेयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल भाजपचे ज्येष्ठ नेते व वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते.
———————————————
शिंदेसेनेतही घराणेशाहीला पायघड्या
1. कोल्हापूरचे उमेदवार खासदार संजय मंडलिक हे दिवंगत खासदार सदाशिव मंडलिक यांचे पूत्र आहेत.
2 . हातकणंगलेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने हे माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत.
3. यवतमाळचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील या हिंगोलीचे मावळते खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत.
4. कल्याणमधील उमेदवार व खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत.
विशेष म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतो, त्यांचे मात्र सर्वात कमी उमेदवार घराणेशाहीतून आले आहेत. याचे कारण म्हणजे युती/ आघाडीत या दोन्ही गटांना सर्वात कमी मतदारसंघ मिळाले आहेत.
अजित पवार गट
- बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार Sunetra Ajit Pawar या पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी आहेत.
- राष्ट्रवादी शरद पवार गट
- 1. बारामतीतील उमेदवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule या शरद पवारांच्या Sharad Pawar कन्या आहेत.
- 2. माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे
बाळासाहेब ठाकरेंनी तळागाळातील तरुणांना राजकारणात आणून आमदार- खासदार ही पदे दिली. मात्र हीच मंडळी आता बाळासाहेबांचे विचार सोडून घराणेशाहीचे घोडे पुढे दामटत आहेत.
1. धाराशिवचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव व माजी मंत्री पदमसिंह पाटील यांचे पुतणे आहेत.
2. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील हे मुलुंडचे आमदार दीना बामा पाटील यांचे चिरंजीव
3. वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर हे याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.
4. जळगावातील उमेदवार करण पवार हे २० वर्षे आमदारकी भास्कर पाटील यांचे नातू, व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत.
5. हातकणंगलेत उमेदवार सत्यजित पाटील हे आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांचे पुत्र
6 मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे पिंपरीचे सरपंच, नगरसेवक, महापौर होते.
7. नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकरराव, आजी रूक्मिणी वाजे सिन्नरच्या आमदार होत्या. वडिलांनीही विधानसभा निवडणूक लढविली होती.
गांधी घराण्यामुळे कायम परिवारवादाची टीका होत असलेल्या काँग्रेसचे राज्यात सर्वात कमी फक्त ४ उमेदवार घराणेशाहीतून आहेत.
- सोलापूरच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.
2. . नंदूरबारचे उमेदवार गोवाल पाडवी हे नंदूरबारचे ३० वर्षांपासून आमदार असलेले व मंत्रिपदही भूषवलेले के.सी.पाडवी यांचे पूत्र आहेत.
3. चंद्रपूरच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत.
4. वर्धा येथील उमेदवार माजी आमदार अमर काळे समाजवादी काँग्रेसचे माजी आ. डॉ.शरद काळे यांचे पुत्र आहेत.