महाविकास आघाडीचे अखेर ठरलं; उद्धव सेनेला २०, काँग्रेसला १८, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळणार

संग्रहित छायाचित्र.

Loksabha Election-MVA Seat Sharing Final stage लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. आता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले व प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ५ मार्चनंतर एक निर्णायक बैठक होणार असून त्यात या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर हे जागावाटप जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loksabha Election-MVA Seat Sharing Final stage

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर तीन प्रमुख पक्षांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Udhav Thackeray Shiv sena) २०, काँग्रेसला (Congress) १८ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Sharad Pawar) १० जागा देण्याचे ठरले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने २७ जागांची यादी सादर करुन ७ जागांबाबत आग्रह धरला असला तरी त्यांना फक्त दोनच जागांवर समाधान मानावे लागेल. तर हातकणंगलेची एक जागा राजू शेट्टींना (Raju Shetty Candidate of MVA in Hatkangale) दिली जाईल. वंचितच्या जागा शिवसेनेच्या तर शेट्टींची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून दिली जाईल.

शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Udhav Thackeray), नाना पटोले (Congress State President Nana Patole) व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत ५ मार्चनंतर एक निर्णायक बैठक होणार असून त्यात या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर हे जागावाटप जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. MVA’s Seat Sharing finally announce after 5 March.

हिंगोली, जालन्याची अदलाबदल रद्द Hingoli, Jalna Exchange Cancle

हिंगोलीत सध्या शिवसेनेचे तर जालन्यात भाजपचे खासदार आहेत. मात्र हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदेगटात गेल्याने ही जागा आम्हाला मिळावी, असा काँग्रेसचा आग्रह होता. त्या बदल्यात सातत्याने पराभव होत असलेली जालन्याची जागा उद्धव सेनेला देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली होती. मविआ नेत्यांच्या चार बैठकीत यावर सकारात्मक चर्चाही झाली. मात्र ज्या अशोक चव्हाण यांच्या भरोशावर काँग्रेस हिंगोलीची जागा मागत होते तेच चव्हाण भाजपमध्ये गेल्याने आता काँग्रेसनेही हा नाद सोडला आहे. त्यामुळे हिंगोलीची जागा पूर्वीप्रमाणे उद्धव ठाकरेंकडेच राहिल  जालन्यातही काँग्रेसच लढेल, हे आता स्पष्ट झाले आहे. हिंगोलीतून उद्धव सेना हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. तर जालन्यात मात्र काँग्रेसला यंदाही तगडा उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर पक्षाची भिस्त आहे.

Loksabha Election-MVA Seat Sharing Final stage

प्रकाश आंबेडकरांना हवी अकोल्याची जागा Prakash Ambedkar’s insistence for Akola

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना दोन जागा दिल्या जातील. हो- नाही करत प्रकाश आंबेडकरही त्या स्वीकारतीलच. मात्र त्यात अकोल्याची एक जागा हवीच यासाठी त्यांचा आग्रह आहे. कारण आंबेडकर स्वत: त्या जागेवर उभे राहणार आहेत. मविआ नेतेही त्यासाठी तयार आहेत. मात्र दक्षिण मुंबईतील जागेवर त्यांनी उमेदवार द्यावा, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. जमल्यास स्वत: आंबेडकरांनी तिथे उभे राहावे, असे त्यांना वाटते. पण आंबेडकरांना मात्र ते मान्य नाही.