विजय शिवतारेंची हवा गूल… एकनाथ शिंदे- फडणवीसांनी दम देताच बारामतीत अपक्ष लढण्याची घोषणा मागे
अजित पवारांसमोरील दुसरा अडसर संपला, या आधी महादेव जानकरांचीही नाराजी केली दूर
Loksabha election- Shivtare’s decision to contest election in Baramati is cancelled
बारामती : ‘बारामतीचा सातबारा पवारांच्या नावावर आहे काय? बारामतीचा खासदार पवारच असावा असा काही नियम आहे का? भोर- पुरंदरचाही खासदार होऊ शकतो. काहीही झाले तरी यावेळी पवारांविरोधात लढणार,’ अशा मोठमोठ्या वल्गना करत चार दिवस माध्यमांमध्ये चर्चेत राहिलेले शिंदेसेनेचे नेते विजय शिवतारे Vijay Shivtare यांना अखेर पवारविरोधी तलवार मान्य करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यासोबत झालेल्या बंदद्वार चर्चेनंतर अपक्ष उमेदवारीचा निर्णय शिवतारे यांनी मागे घेतला. आता महायुतीच्या उमेदवार व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात ते सक्रिय झालेले दिसतील.
माजी आमदार विजय शिवतारे Vijay Shivtare व पवार कुटुंबीयांचे राजकीय वैर तसे जुनेच आहे. शिवतारे यांचा पुरंदर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभेत येतो. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले शिवतारे २००९ व २०१४ च्या निवडणुकीत पुरंदरचे आमदार होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांना खुले चॅलेंज करुन ‘तू कसा निवडून येतो ते बघतोस’ असा इशारा दिला होता. दादांनी तो खराही करुन दाखवला. त्यामुळे २०१९ मध्ये शिवतारे पडले. तेव्हापासून अजित पवारांविरोधात त्यांच्या मनात खूप राग आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा Sunetra Pawar उभ्या असल्याने दादांना कोंडीत पकडण्याची चांगली संधी शिवतारेंकडे चालून आली. त्यांनी ही संधी ‘कॅश’ही केली. पवारांविरोधात तिसरा उमेदवार म्हणून आपण बारामतीतून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सासवडच्या पालखी तळावर अजित पवारांनी पाच वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची वारंवार जनतेला जाणीव करुन दिली. बारामतीत पवार घराण्यात पडलेल्या फुटीचा फायदा घेऊन तिसरा उमेदवार विजयी होऊ शकतो, असे गणितही शिवतारे यांनी मांडले. त्यासाठी पवारविरोधक अनंतराव थोपटे, संग्राम थोपटे, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांची भेट घेऊन मोट बांधण्यासही सुरुवात केली होती.
हेही वाचा… शिवतारे म्हणायचे… बारामती म्हणजे पवारांचा सातबारा नाही
https://missionpolitics.com/vijay-shivtares-challenge-to-pawar-in-baramati-lok-sabha/
अजितदादा गट अस्वस्थ Ajitdada group upset
शिवतारेंच्या या हालचालींमुळे अजित पवार गोटात Ajitdada group upset मात्र अस्वस्थता वाढत होती. याचे कारण म्हणजे सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार आहेत. भोर, पुरंदर भागात भाजप- शिवसेनेची मते पवारांकडे खेचून आणण्याचे आधीच आव्हान असताना शिवतारे उभे राहिले तर ही मते त्यांच्याकडे वळतील. त्यामुळे सुप्रिया सुळेंना Supriya Sule कमी पण सुनेत्रा पवारांनाच जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन अजित पवारांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली. एकनाथ शिंदेंनी दोनदा शिवतारे यांना बोलावून माघार घेण्याबाबत समजावले. वेळप्रसंगी पक्षातून निलंबनाची कारवाई करू, अशी धमकीही दिली. मात्र शिवतारे बधले नाहीत. काहीही झाले तर आता माघार नाही, बारामतीत लढणारच असे ते माध्यमांसमोर वारंवार सांगत होते. त्यामुळे अजितदादा गटाची अस्वस्थता वाढत होती. अखेर २७ मार्च रोजी शिंदे- फडणवीस यांनी अजित पवार व शिवतारे यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील नाराजी दूर केली. अजित पवारांकडून शिवतारेंना काही आश्वासनेही दिली. इतकेच नव्हे तर याउपरही जर बारामतीत काही दगाफटका झालाच तर तुमची काही खैर नाही, असा सज्जड दमही शिंदे- फडणवीस यांनी शिवतारेंना दिला. नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानून व आपल्या आधीच्या वल्गनांना पाणी सोडून शिवतारे यांनी निवडणुक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत पुरंदरमधून शिवतारे यांना निवडून आणण्याची हमी अजित पवार यांनी दिली, त्यावर शिवतारे यांचे समाधान झाल्याचे मानले जाते.
Loksabha election- Shivtare’s decision to contest election in Baramati is cancelled
जानकरांनंतर अजितदादांची दुसरी अडचण दूर
महायुतीतील मित्रपक्ष रासपचे नेते महादेव जानकर Mahadev Jankar भाजपवर नाराज होते. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना गळाला लावून महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर माढात निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. माढा व बारामतीत मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. जानकर हे धनगर समाजाचे नेते मानले जातात. त्यांना माढ्यात मदत करुन, बारामतीतील धनगर व्होटबँक सुप्रिया सुळे Supriya sule यांच्याकडे वळवायची अशी रणनीती शरद पवारांची Sharad Pawar होती. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढणार होत्या. हे लक्षात येताच अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हालचाली करत महादेव जानकर यांची नाराजी दूर केली. त्यांना एक मतदारसंघ देण्याचे आश्वासन दिले. त्यावर ठेऊन जानकरांनीही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय बदलला. आता जानकर सोबत असल्याने धनगर मते सुनेत्रा पवारांच्या पारड्यात पडतील, असा विश्वास अजित पवारांना वाटतो.
हेही वाचा… शरद पवारांचा डाव फसला; महादेव जानकर महायुतीतच, शिंदे- फडणवीसांनी केली नाराजी दूर
https://missionpolitics.com/sharad-pawars-game-failed-mahadev-jankar-with-bjp/
आता राहिले हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil’s opposition continued
इंदापूरचे माजी आमदार व भाजप नेते हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांचा मतदारसंघही बारामती लोकसभेत येतो. हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांचा अनेक वर्षांपासून छत्तीसचा आकडा आहे. अजितदादांनी आपले समर्थक दत्तात्रय भरणे Dattatrya Bharne यांच्या पाठीशी संपूर्ण शक्ती उभी करुन इंदापूरमधून हर्षवर्धन यांचा दोनदा पराभव केला. आता अजित पवार महायुतीत आले तरी हषवर्धन व अजितदादा गटाचे फारसे जमत नाही. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अजितदादांचे कार्यकर्ते आम्हाला धमक्या देत आहेत, अशी तक्रार करुन त्यांच्या गुंडगिरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती.
इंदापुरातून सुप्रिया सुळेंना पाठिंबा Support to Supriya Sule from Indapur
बारामती लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांची मतेही तितकीच महत्त्वाची आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी इंदापूरमध्ये मेळावा घेतला, त्याचे फोटो हर्षवर्धन यांच्या कन्या अंकिता Ankita Harshwardhan Patil यांनी शेअर केले होते. यावरुन हर्षवर्धन पाटील हे शरद पवार- सुप्रिया सुळेंना साथ देणार असल्याचे हे संकेत आहेत. बारामती जिंकायची असेल तर महादेव जानकर, विजय शिवतारे यांच्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांचीही मदत मिळायला हवे, असे दादांना वाटते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे मन वळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanis यांच्याकरवी दादांचे प्रयत्न सुरु आहेत. पाटलांनी मात्र अजून त्याला प्रतिसाद दिलेला नाही.