उद्धव सेनेचे १७ उमेदवार जाहीर; संभाजीनगरहून चंद्रकांत खैरे, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यांची नावे फायनल
पक्षफुटीनंतरही सोबत राहिलेल्या पाचही खासदारांची उमेदवारी उद्धव ठाकरेंकडून कायम, वायव्य मुंबई- सांगलीवरुन वाद कायम, उमेदवारी बदलासाठी काँग्रेस नेते आक्रमक
Loksabha election-Udhav Thackeray Declard 17 Candidates
मुंबई : उद्धव ठाकरे Udhav Thackeray’s Shivsena यांची शिवसेना महाविकास आघाडीतील ४८ पैकी २२ जागा लढवणार आहे. त्यापैकी १७ उमेदवारांची नावे २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आली. उर्वरित ५ उमेदवारांची नावे दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहेत. एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी बंड करुन सत्ता मिळवल्यानंतरही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणाऱ्या पाचही खासदारांना ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसचा विरोध डावलून उद्धव सेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
Loksabha election-Udhav Thackeray Declard 17 Candidates
- बुलडाणा- नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ- संजय देशमुख
- मावळ – संजोग वाघेरे- पाटील
- सांगली -चंद्रहार पाटील
- हिंगोली- नागेश पाटील अष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
- धाराशीव- खासदार ओमराजे निंबाळकर
- शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
- नाशिक- राजाभाऊ वाझे
- रायगड – अनंत गिते
- रत्नागिरी- सिंधुदुर्ग – खासदार विनायक राऊत
- ठाणे- खासदार राजन विचारे
- मुंबई- ईशान्य (उत्तर पूर्व मुंबई) – संजय दीना पाटील
- मुंबई- दक्षिण- खासदार अरविंद सावंत
- मुंबई वायव्य (उत्तर पश्चिम मुंबई)- अमोल किर्तीकर
- मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
- परभणी- खासदार संजय उर्फ बंडू जाधव
अजून ५ जागांवर निर्णय बाकी 5 seats to be decided
एकूण २२ पैकी १७ उमेदवार जाहीर झाले असून ५ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा दोन दिवसांत करण्यात येईल, असे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी सांगितले. यात पालघर, कल्याण, उत्तर मुंबई, जळगाव, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेसमध्ये नाराजी, बंडाची शक्यता Opposition from Congress
सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा होत. त्यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरेंनी तिथे जाहीर सभा घेऊन उद्धव सेनेकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज आहेत. त्यांनी दिल्लीपर्यंत हा विषय नेला. मात्र उद्धव सेनेच्या यादीत चंद्रहार पाटील यांचे नाव कायम राहिले. त्यामुळे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, उत्तर पश्चिम मुंबईत काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय निरुपम हे इच्छूक होते. मात्र उद्धव सेनेने इथे अमोल गजानन किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे निरुपम हेही बंडाच्या तयारीत आहेत.