राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्समध्ये; मुंबईतील जाहीर सभेत राहुल गांधी यांची मोदींवर टीका
मुंबईतील शिवाजी पार्कच्या सभेत राहूल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांची एकजूट,लोकसभा प्रचाराचा शुभारंभ
Loksabha election- Unity of India Aghadi at Shivaji Park
मुंबई : ‘राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससारख्या संस्थांमध्ये आहे. म्हणूनच आमचा लढा मोदींविरोधात Narendra Modi नसून या शक्तीविरोधात आहे. याच शक्तींनी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना भाजपात जायला भाग पाडले,’ अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी रविवारी केली. मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या आयोजित India rally on shivaji park mumbai या सभेतून इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पीडिपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक आदी सुमारे ४०० नेते व पदाधिकारी हजर होते.
राहूल गांधी Rahul Gandhi म्हणाले, ‘ ईव्हीएमशिवाय मोदी जिंकू शकत नाही. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले की ईव्हीएम उघडून दाखवा. पण त्यांनी दाखवले नाही. मत मशिनमध्ये नसते तर कागदात असते. तुम्ही मशिन चालवा, पण कागदाचीही मोजणी करा पण त्यांनी नकार दिला. भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. ती इलेक्टोरल बाँडमध्ये दिसून आली. पैसा द्या अन् कंत्राट घ्या, अशी पॉलिसी त्यांनी देशात सुरु केलीय.
एक नेता सोनियांकडे रडला
एका ज्येष्ठ नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. त्यापूर्वी त्याने माझ्या आईला सांगितलं की, ‘सोनियाजी मला लाज वाटतेय. या लोकांविरोधात, या शक्तींविरोधात लढण्याची माझी हिंमत नाही. मला तुरुंगात जायचे नाहीए… असे एक नव्हे हजारो लोक या शक्तींनी घाबरुन टाकलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीचेही लोकही असेच गेले. या शक्तीने गळा पकडून त्यांना भाजपात पाठवले,’ असा दावा राहूल यांनी केला.
मोदींची गॅरंटी खोटी : शरद पवार
शरद पवार shrad Pawar म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.’
—
अबकी बार.. भाजपा तडीपार : उद्धव ठाकरे
—
उद्धव ठाकरे udhav thackeray म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे आणि त्यात हवा भरण्याचे काम शिवसेने केले आहे. आता भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे. आता लढाई आहे ती लोकशाही व संविधान वाचवण्याची. घटना बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा आहेत. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. कोणी कितीही मोठा असू त्याच्यापेक्षा देश मोठा असतो. २०१४ पासून एकाच पक्षाचे सरकार आहे, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. जनता एकवटली तर हुकूमशाहीचा अंत होतो. अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा घेऊन गावागावात जा, असे ठाकरे म्हणाले.
आंबेडकर म्हणतात… एकत्र लढू किंवा वेगळे लढू
प्रकाश आंबेडकर Praksh ambedkar म्हणाले की, इलोक्टोरल बाँडबद्दल अमित शाह स्पष्टीकरण देतात. पण फ्युचर गेमिंगसारख्या अनेक कंपन्या आहेत ज्यांनी नफ्यापेक्षा जास्त किमतीचे बाँड खरेदी केली, त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला? याची चौकशी केली पाहिजे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी आवाज उठवावा. आपल्या सर्वांनाच त्याविरोधात लढावे लागेल. एकत्र लढू किंवा वेगळे लढू, पण आपल्याला लढावे लागेल.’