प्रकाश आंबेडकरांचे धक्कातंत्र; मविआशी काडीमोड, मनोज जरांगे पाटील यांच्याशी हातमिळवणी
वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले ८ उमेदवार, फक्त नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंना पाठिंबा जाहीर
अकोला : लोकसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळत नसल्याचे कारण देत वंचित बहुजन आघाडीचे vanchit bahujan aaghadi प्रमुख प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी अखेर महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचे २७ मार्च रोजी स्पष्ट केले. तसेच पहिल्या टप्प्यात ८ लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवारांची घोषणाही केले. स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उभे राहणार आहेत. Loksabha- Prakash Ambedkar Join hand with Manoj Jarange patil.
सर्वात धक्कादायक म्हणजे मराठा आरक्षणासाठी गेले ८ महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange patil यांच्याशी हातमिळवणी करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला. २६ मार्च रोजी रात्री उशिरा त्यांनी आंतरवली सराटी येथे जाऊन जरांगेशी बराच वेळ चर्चा केली, त्यानंतर सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. ३० मार्चनंतर जरांगे व आम्ही निवडणुकीबाबतची पुढील रणनीती जाहीर करु, असेही प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले. दरम्यान, मनेाज जरांगे Manoj Jarange patil यांनी मात्र आतापर्यंत या नव्या युतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Prakash Ambedkar Contest From Akola
वंचित आघाडीचे उमेदवार vanchit bahujan aaghadi’s 8 candidates
- अकोला- अॅड. प्रकाश आंबेडकर
- भंडारा- गोंदिया- संजय केवट
- गडचिरोली- चिमूर- हितेश मडवी
- चंद्रपूर- राजेश बेले
- बुलडाणा- वसंत मगर
- अमरावती- कु. प्राजक्ता पिल्लेवार
- वर्धा- प्रा. राजेंद साळुंके
- यवतमाळ- वाशिम- सुभाष खेमसिंग पवार
रामटेक मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव सायंकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नागपूरात काँग्रेसला, सांगलीत प्रकाश शेंडगेंना पाठिंबा Vanchit Supprots Congress in Nagpur, Prakash shendage in Sangali
नागपुरात वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केला नाही. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसे तिथे आमदार विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकरांनी जाहीर केले. दुसरीकडे, सांगलीत ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे यांनी उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी उमेदवारी दाखल केल्यास वंचित आघाडी तिथे शेंडगे यांच्या पाठीशी उभी राहिल, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीशी का जुळले नाही? Prakash Ambedkar did’t Compramise with MVA
महाविकास आघाडीत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी सुरुवातीपासूनच अनुकूल भूमिका घेतल्याचे दाखवले होते. मात्र जसजशी जागावाटपाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून मात्र ते कधीच तडजोडीच्या भूमिकेत दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेस congress, उद्धव सेना Udhav Thackeray’s Shiv sena व राष्ट्रवादी शरद पवार गटही Ncp Sharad Pawar सावधतेनेच पावले टाकत होते. सुरुवातीच्या काही बैठका या तीन पक्षातच झाल्या. त्यानंतर वंचितच्या प्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात आले. सुरुवातीला वंचितने थेट २७ मतदारसंघाची यादीत मविआ नेत्यांच्या हाती सोपवली, त्यामुळे सर्वच जण अवाक झाले. नंतर २७ वरुन ७ मतदारसंघावर वंचितचे नेते आले. या जागांवर मात्र ते ठाम राहिले. दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांना आधी ३ नंतर ४ व शेवटच्या टप्प्यात ६ जागांची ऑफर दिली होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी त्यापूर्वीच संभाव्य युतीची आता शक्यता नसल्याचे सांगत स्वबळाचे संकेत दिले होते. आंबेडकरांचा हा पवित्रा पाहून उद्धव ठाकरे, शरद पवारांनी Shrad pawar त्यांचा नाद सोडला होता. काँग्रेसचे नेते मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र जुळवून घेण्याची वंचितच्या नेत्यांची तयारी नव्हती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे Mallikarjun Kharge यांना पत्र पाठवून आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात ७ जागांवर पाठिंबा देऊ, अशी ऑफर दिली होती. मात्र काँग्रेसने त्यालाही प्रतिसाद दिला नव्हता. ७ जागांची नावेही वंचितला कळवली नव्हती. वंचितला मविआतच घेण्याचा त्यांचा आग्रह होता, पण प्रकाश आंबेडकरांच्या मनात ते नव्हते. अखेर त्यांनी स्वबळावर जाण्याचा निर्णय घेऊन उमेदवारही जाहीर केले.
हेही वाचा… चार जागा तुम्हालाच ठेवा म्हणत प्रकाश आंबेडकरांनी दिले स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत; भाजपला फायदा होणार
https://missionpolitics.com/prakash-ambedkar-left-maviyas-support/
वंचितच्या साडेसात टक्के मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर BJP benefits from Vanchit’s decision
२०१९ च्या निवडणुकीतही शेवटपर्यंत जागावाटपाचे सूर न जुळल्याने वंचित आघाडी व एमआयएमने एकत्र येत स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यात वंचित आघाडीला ४८ मतदारसंघात सरासरी ७.६५ टक्के मतदान मिळाले. ८ मतदारसंघात तर दीड ते तीन लाखांपर्यंत मतदान मिळाले. या जागांवर वंचितमुळे काँग्रेस- राष्ट्रवादीवर हक्काच्या मतदारसंघात पराभवाची नामुष्की आली होती. याचा फायदा तत्कालिन भाजप – शिवसेना युतीच्या उमेदवारांना झाला होता. एमआयएमचा एक खासदार निवडून आला, पण वंचितचा मात्र एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून काँग्रेससह मविआ नेत्यांनी खूप प्रयत्न केले, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या ताठर भूमिकेमुळे यंदाही २०१९ सारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र यावेळी एमआयएम सोबत नसल्याने वंचितला मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळतील का? याविषयी शंका आहे.
म्हणून आता मराठा- ओबीसी मतांवर लक्ष्य Now targeting Maratha-OBC votes
मुस्लिम, ओबीसी उमेदवारांना वंचित आघाडी उमेदवारी देईल, अशी घोषणा करुन प्रकाश आंबेडकरांनी Prakash ambedkar या समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी बहुजन आघाडी या नव्याने स्थापन झालेल्या पक्षासोबतही त्यांनी संधान साधले आहे. या पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना सांगलीतून न मागता वंचितने पाठिंबा जाहीर केला. तर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange patil यांच्याशीही हातमिळवणी करुन सरकारविरोधात गेलेली मराठा समाजाची मते वंचितकडे वळवण्याची खेळी प्रकाश आंबेडकरांनी Prakash ambedkar केली आहे. मात्र वंचितच्या या ऑफरला मनोज जरांगे कितपत प्रतिसाद देतात यावर वंचितच्या रणनितची भवितव्य अवलंबून आहे.