ॲड. प्रकाश आंबेडकर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत, तीन उमेदवार जाहीर; मविआच्या कार्यक्रमांना जाऊ नका, कार्यकर्त्यांना आदेश
वंचितला आघाडीत सहभागी करुन घेण्याचा काँग्रेसचा खोडा; म्हणून आंबेडकरांनी दिले स्वबळाचे संकेत
–
मुंबई : भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी यावेळी सुरुवातीपासून घेतली. आधी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली. नंतर मविआत प्रकाश आंबेडकरांना घेण्यासाठी ठाकरेंनी शरद पवार यांचीही ‘एनओसी’ घेतली. मात्र गेल्या महिनाभरापासून काँग्रेसचे नेते मात्र याबाबतचा निर्णय घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता आघाडीतून नव्हे तर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करुन यापुढे मविआच्या कार्यक्रमांना न जाण्याचे आवाहन केले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकरांना Prakash Ambedkar आपल्या आघाडीत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी ताठर भूमिका घेत अशा काही अटी शर्थी ठेवल्या की त्यांना आघाडीत घेणे दोन्ही काँग्रेसला शक्य झाले नाही. परिणामी वंचित बहुजन आघाडीने एमआयएमच्या साथीने ती निवडणूक लढवली होती. महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला. वंचित व एमआयए आघाडीच्या उमेदवारांनी गेल्या वेळी एक ते दीड लाखांवर मते घेतली. त्यामुळे काँग्र्रेस व राष्ट्रवादीला ७ ते ८ लोकसभा मतदारसंघ गमवावे लागले. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (नांदेड) व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) यांचाही समावेश होता.
वंचितला घेण्यास काँग्रेसची आडकाठी
Congress blocks Prakash Ambedkar
यावेळी मात्र प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkarसुरुवातीपासूनच आघाडीत सहभागी होण्यासाठी इच्छूक दिसले. त्यांनी अगदी जाहीरपणे माध्यमांसमोर ही भूमिका बोलूनही दाखवली. मविआच्या बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात आले. सुरुवातीला वंचितने २७ जागांची अवास्तव मागणी केली, मात्र नंतर त्यात तडजोडीची तयारीही दर्शवली. मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांच्या जागावाटपाच्या चार- पाच बैठका झाल्या, त्यात शेवटच्या २ बैठकांत वंचितचे प्रतिनिधीही हजर होते. हे सारे घडत असताना आमचा अजून अाघाडीत समावेशच झाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर सांगत आहेत. म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी त्यांना मविआत घेण्यास तयारी असली तरी काँग्रेसने अजून हिरवा कंदिल दाखवलेला नाही. त्यांना अजून प्रकाश आंबेडकरांवर विश्वास वाटत नाही. मात्र यावेळी वंचित मविआसोबत आली नाही तर २०१९ प्रमाणे काही मतदारसंघात मविआला धर्मनिरपेक्ष मतांचा मोठा फटका बसू शकतो.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
What Prakash Ambedkar said
कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुका जाहीर होतील. भाजपसह काही पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले. असे असताना महाराष्ट्रात अजून आपल्याला आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत निर्णय होत नसल्याने प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar संतापले आहेत. त्यामुळेच रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते म्हणतात, ‘महाविकास आघाडीशी अजून वंचित आघाडीची अधिकृतपणे युती झालेली नाही. त्यामुळे मविआतील घटक पक्षांच्या कार्यक्रमांना आपल्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये. याबाबत मी किंवा वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा अधिकृत निर्णय जोपर्यंत कळवला जात नाही तोपर्यंत कुणीही इतरांच्या निर्णयावर विश्वास ठेऊ नये,’ असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आघाडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
वंचितचे तीन उमेदवार जाहीर
Three candidates from Vanchit announced
वंचित आघाडीने अकोला, सांगली व वर्धा या तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्याची चर्चा होती. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, मी अकोल्यातून लढणार आहे. मी यापूर्वीच ही घोषणा केली आहे. वर्धा येथे प्रा. राजेंद्र साळुंखे व सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी स्थानिक पातळीवरुन आमच्याकडे मागणी आलेली आहे. मात्र अद्याप त्यांच्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. सांगलीचा निर्णय आम्ही ८ मार्च रोजी घेऊ,’ असे सांगून आंबेडकरांनी तीन उमेदवार जाहीर केल्याच्या चर्चेचे खंडन केले.
एकटे लढलो तर आमचा सामना भाजपशी
fight alone, will face the BJP
प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, ‘आम्ही आघाडीत आहोत की नाही हेच मला अजून कळालेले नाही. मीही त्यांच्या निरोपाची वाट पाहात आहे. ६ मार्च रोजी भेटू असा निरोप मला शरद पवारांकडून मिळाला आहे. पण मविआच्या बैठकीचे अद्याप मला कुठलेही निमंत्रण मिळालेले नाही. मविआत आमचा समावेश झाला नाही तरी आम्ही स्वतंत्र लढू. भाजपला पराभूत करणे हे आमचे ध्येय आहे. जर आम्ही स्वबळावर लढलो तर आमची लढाई भाजपशी असेल,’ असा इशारा त्यांनी दिला.