राज ठाकरेंचा उमेदवार धनुष्यबाणावर लढणार; शिंदे- फडणवीस- राज यांची दीड तास खलबते; अजित पवार मात्र गैरहजर

Maharashtra Politics-Shinde, Fadanvis meeting With Raj Thackeray मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची मुंबईत चर्चा

Maharashtra Politics-Shinde, Fadanvis meeting With Raj Thackeray
मुंबई :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीत मनसेला (MNS In NDA) महायुतीत सामील करण्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) तयार झाले नाहीत. त्यामुळे २० व २१ मार्च रोजी मुंबईत देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis, एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी पुन्हा त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मनसेला    लोकसभेची दक्षिण मुंबई किंवा शिर्डी यापैकी एक जागा देण्यास दोन्ही नेत्यांनी तयारी दर्शवली, मात्र हे दोन्ही मतदारसंघ शिंदेसेनेचे असल्यामुळे मनसेचे संभाव्य उमेदवार बाळा नांदगावकर यांना धनुष्यबाणावर लढावे लागेल, अशी अट एकनाथ शिंदेंनी घातली असल्याचे समजते.

Raj Thackeray’s candidate will contest on Dhanushyaban.

अमित शाह यांची भेट झाल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी २१ मार्च रोजी निवडक पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक ठेवली होती. सकाळी सगळे पदाधिकारी जमले असताना अचानक राज ठाकरे शिंदे- फडणवीस यांच्या भेटीसाठी निघून गेले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या तिघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.

Maharashtra Politics-Shinde, Fadanvis meeting With Raj Thackeray

विधानसभेचा हट्ट सोडा Discussion of the Assembly to the Assembly

राज ठाकरे Raj Thackeray यांनी अमित शाह Amit Shah यांच्याशी चर्चेत लोकसभेसोबत विधानसभेचे जागावाटपही ठरवून घ्या, अशी अट ठेवली होती. त्यावर नंतरचे नंतर पाहू, असे अमित शाह यांनी सांगितले. त्यामुळे ही चर्चा फिसकटली. मात्र यावर राज यांची समजूत घालण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे फडणवीस यांनी २० मार्च रोजी रात्री राज यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर २१ मार्च रोजी एकनाथ शिंदे व फडणवीस या दोघांनी राज यांच्याशी एकत्रित चर्चा केली. ‘एकदा तुम्ही महायुतीत आले की विधानसभेलाही सोबत राहणारच आहात. तेव्हाच्या जागावाटपाचा अद्याप विषय नाही. सध्या लोकसभेवर फोकस आहे. त्यामुळे तुम्ही विधानसभेचा हट्ट सोडा, लोकसभेचे ठरवा’ अशी विनंती फडणवीस यांनी राज यांना केली. विधानसभेलाही तुम्हाला सन्मानजनक जागा देण्याची हमी फडणवीस यांनी घेतली. त्यावर राज यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय कळवतो, असे सांगितले व बैठकीतून ते निघून गेले.

Maharashtra Politics-Shinde, Fadanvis meeting With Raj Thackeray

मनसेला लढावे लागेल धनुष्यबाणावर

दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी लोकसभेचा एकतरी मतदारसंघ मनसेला द्यावा, असा राज ठाकरेंचा Raj Thackeray आग्रह आहे. सध्या या तीनही जागावर शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे हे तिन्ही मतदारसंघात शिंदेसेनेच्या वाट्याला येतील. त्यापैकी शिर्डीची जागा सोडण्यास शिंदे तयार आहेत. तेथून मनसेच्या बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळू शकते. पण महायुतीत आधीच आपल्या वाट्याला २०१९ च्या विजयी खासदारांच्या तुलनेत कमी जागा येत आहेत, त्यात अजून एक जागा गेली तर पक्षाचे नुकसान होईल. म्हणून मनसेने ही जागा धनुष्यबाण चिन्हावर लढवावी, अशी इच्छा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यावर निर्णय झाला नसला तरी राज अनुकूल असल्याचे कळते.  Raj Thackeray’s candidate will contest on Dhanushyaban.

अजित पवार चर्चेपासून दूरच Ajit Pawar far away from Raj Thackeray

महायुतीत अजित पवारांना तिसरा पार्टनर म्हणून आणल्यानंतर शिंदे गट नाराज झाला होता. कारण तिसऱ्या भागीदारांमुळे मंत्रिपदे व इतर वाटाघाटीत अजून एक हिस्सा वाढला होता. आता चौथा पार्टनर येत आहे. त्यामुळे शिंदे सेना व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. दुसरीकडे, राज ठाकरेंशी चर्चा करताना शिंदे, फडणवीस उपस्थित असले तरी अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. ‘तुमचे तुम्ही बघा. आमच्या कोट्यातून मनसेला जागा देऊ नका’ अशी भूमिका त्यांच्या पक्षाने घेतल्याचे कळते.