Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाने सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्व्हे कसा केला : नाना पटोले

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे. या सर्व्हेत  ५००  प्रश्न आहेत एका अर्जाला तास ते दीड तास लागतो मग कोणत्या आधारावर हा सर्व्हे केला?  Congress objected to the Maratha survey. मुंबई शहरात सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा काय होऊ शकतो? असे प्रश्न उपस्थित करत सरकार मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करत आहे, असा आरोप  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

लोणावळ्याच्या हॅाटेल मेट्रो पार्क येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून काँग्रेस पक्षाच दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचा शुभारंभ झाला, त्यावेळी माध्यमांशी बोलताना  पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व घेतलेली शपथ पूर्ण केली असे नवी मुंबईत जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांचे उपोषण सोडताना जाहीर केले होते. पण पुन्हा उपोषण करण्याची वेळ जरांगे पाटील यांच्यावर का आली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली? हे जनतेला समजले पाहिजे. सरकार दोन जातीत भांडणे लावत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचे काम करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.’

कोर्टात आरक्षण टिकले पाहिजे Maratha Reservation should survive in court

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे व सर्वपक्षीय बैठकीतही ते मान्य करण्यात आले होते. नागपुरच्या हिवाळी अधिवोशनातही काँग्रेसने आरक्षण प्रश्न उपस्थत करत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी अशी विचारणा केली होती पण सरकारने स्पष्टता आणला नाही. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने पास करुन घेतला होता. परंतु ते आरक्षण सुप्रीम कोर्टानत टिकले नाही, कोर्टाने ताशेरे ओढले. आता पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी दोन दिवसांच्या अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, कायदा करत असताना स्पष्टता आली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

अहवाल वेबसाईटवर जाहीर करा : पृथ्वीराज चव्हाण Publish the Maratha Survey Report

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा. अध्यादेश काढण्यास अधिवेशनाची गरज नाही तो पास करण्यास अधिवेशन लागते. आयोगाच्या अहवालात काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला व जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनाही कळले पाहिजे, त्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज काय ? तसेच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृत्तीला काय झाले तर जबाबदार कोण? मुख्यमंत्री शिंदे व मनोज जरांगे पाटील यांची बोलणी झाली, उपोषण सोडले, गुलाल उधळला व प्रश्न सुटला असे सांगितले मग पुन्हा उपोषण करण्याची गरज काय पडली याची उत्तरे दिली पाहिजेत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Maratha Reservation मराठा समाज मागास असल्याचा अहवाल; सरकार स्वतंत्र आरक्षणाचा कायदा करणार

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics