जरांगे यांना सरकारने चोहोबाजूंनी घेरले; आधी मुंबईत येण्यापासून रोखले आता आंदोलनाची एसआयटी चौकशी
Maratha Reservation-Government declared Sit inquiry मुंबई : सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबद्दल केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांच्या चांगलीच अंगलट येत आहे. आतापर्यंत जरांगेंप्रती सॉफ्ट असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण सत्ताधारी पक्षच जरांगेंवर तुटून पडला आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावून त्यांचा मुंबईकडे कूच करण्याचा डाव हाणून पाडण्यात आला. आता मराठा आरक्षणासाठी जिथे जिथे हिंसक आंदोलन झाले त्या घटनांची, त्यामागचा सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. Maratha Reservation-Government declared Sit inquiry
रविवारी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) फडणवीसांचा मला संपवण्याचा कट असल्याचा आरोप केला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या ‘सागर’ बंगल्यासमोर आपण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. अधिवेशन काळात जरांगे मुंबईत आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून सरकारने त्यांना भांबेरी गावातच रोखले. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने जरांगेंना परत आंतरवलीत जावे लागले. दुसरीकडे, त्यांच्या ५ समर्थकांना पोलिसांनी दिवसभर ताब्यात घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात स्थानबद्ध केले. या कृतीतून प्रसंगी जरांगे यांनाही अटक होऊ शकते असे संकेत सरकारने दिले. आधी प्रकृती नाजूक आणि त्यात सरकारचा आक्रमक पवित्रा पाहून जरांगेंनी सावध भूमिका घेत मुंबई कूच रद्द केली.
भाजपचे डावपेच BJP’s pressure tactics on Jarange patil
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सोमवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक घेऊन जरांगेंविरोधात आक्रमक होण्याचे निर्देश दिले. त्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात उमटले. विधानसभेत आशिष शेलार, अमित साटम यांनी तर विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी जरांगेंचा बोलवती धनी कोण हे शोधण्याची मागणी केली. दरेकरांनी तर जरांगेंना अटकेची मागणी लावून धरली. अखेर जरांगेंच्या उपोषण काळात झालेल्या मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी SIT inquiry into Maratha agitation करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले. या चौकशीच्या माध्यमातून जरांगे यांना कधीही अडकवले जाऊ शकते, ही भीतीची टांगती तलवार सरकारने त्यांच्यावर व आंदोलकांवर ठेवली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर अद्यापही मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. उलट त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या गुन्ह्यांची भीतीही आंदोलकांवर कायम ठेवून जरांगेंच्या पाठीमागचा जनाधार कमी करण्याचे सरकारचे डावपेच आहेत.
निवडणुकांपर्यंत सरकार दक्ष government will remain vigilant till the elections
आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये म्हणून सरकारने ही सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. त्याशिवाय इतर कोणकोणत्या योजनांचा लाभ दिला हे वारंवार जाहीर केले जात आहे. जेणेकरुन मराठा मतदार निवडणुकीत महायुतीपासून दुरावला जाऊ नये याची खबरदारीही घेतली जात आहे.
भाजपचा राग शिंदेंवरही BJP’s anger on Eknath Shinde too
मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यात गेली चार महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची टीम अग्रेसर होती. त्यांनीच जरांगे यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले त्यामुळे आज जरांगेंचे सरकारविषयी अपशब्द वापरण्याचे धाडस होत आहे, अशी भावन भाजप नेत्यांमध्ये आहे. महायुतीत आपणच मराठ्यांचे खरे नेते आहोत, हे सिद्ध करण्यासाठी शिंदेंची ही धडपड होती, असा निष्कर्ष भाजपकडून काढला जात आहे. मात्र जरांगेंनी फडणवीसांबद्दल गलिच्छ भाषा वापरल्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी सौजन्याने वागायचे नाही, असे भाजपने ठरवले. शिंदेंपर्यंतही तसा मेसेज पोहोचवण्यात आला. त्यामुळेच शिंदेंनाही ‘वेळ आली की मी करेक्ट कार्यक्रम करतो’ ही भाषा जरांगेंबद्दल वापरावी लागली. तसेच विधानसभेतही शिंदे यांना जरांगेंचे बोलवते धनी कोण हे शोधण्यासाठी एसआयटी चौकशीची मागणी करावी लागली. Maratha Reservation-Government declared Sit inquiry