मनोज जरांगे पाटलांनी निम्मी लढाई जिंकली; कुणबी वारसा नोंदी असणाऱ्यांना सग्या- सोयऱ्यांसह ओबीसी आरक्षण

मुंबई : सर्वच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंतरवली सराटी (जि. जालना) येथून लढ्याचे रणशिंग फुंकणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अंशत: यश आले आहे. कुणबी असल्याच्या वारसा नोंदी सापडणाऱ्यांना व त्यांच्या सग्या- सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. या माध्यमातून त्यांना ओबीसी आरक्षणाचे सर्व लाभ मिळू शकतील.

मात्र सरसकट आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर निर्णय सरकार घेऊ शकले नाही. २४ जानेवारी रोजी सरकारच्या क्युरेटिव्ह पीटिशनवर सुनावणी झाली आहे, मात्र त्याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे उर्वरित समाजाच्या आरक्षणाची लढाई आता कायदेशीर पातळीवरच लढावी लागणार आहे.

लाखोंच्या मोर्चाला यश

२० जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव आंतरवली सराटी येथून मोर्चाने मुंबईकडे निघाले होते. बीड, नगर, पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करत हा मोर्चा २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत पोहोचला. तिथे वाशीतील बाजार समितीच्या मैदानावर त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली होती.

२६ जानेवारी रोजी जरांगे मुंबईकडे निघून लाखो समर्थकांसह आझाद मैदानावर उपोषण करणारे होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत सरकारने त्यांना मुंबईत येण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जरांगेंचे समर्थक नवी मुंबईतच ठिय्या देऊन होते. अखेर २६ जानेवारी रोजी सरकारने जरांगेंच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. सरकारच्या शिष्टमंडळ २५ जानेवारीपासून त्यांच्याशी चर्चा करत होते. अखेर २६ जानेवारी रोजी रात्री उशिरा निर्णयावर एकमत  झाले व २७ जानेवारी रोजी सकाळी याबाबतचे राजपत्र काढण्यात आले. त्यामुळे लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांनीजल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (cm eknath Shinde declears maratha reservation) नवी मुंबईत येऊन लाखो आंदोलकांसमोर निर्णय जाहीर केले.

राजपत्रात काय नोंद

  • कुणबी असल्याच्या वारसा नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi centificate) देण्यात यावे.
  • ज्यांच्या वारसा नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील किंवा मराठा जातीतच विवाह झालेल्या सग्या- सोयऱ्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना आपल्या सोयऱ्यांकडे प्रमाणपत्राच्या प्रती, त्यांच्याशी नातेसंबंधाचे पुरावे व शपथपत्र सादर करावे लागेल.
  • या राजपत्रातील निर्णयाविरोधात आक्षेप/ हरकती नोंदवण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.

सगे सोयरे म्हणजे कोण?

राजपत्रातील नोंदीनुसार, अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये मराठा जातीतील झालेल्या लग्ननातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक, म्हणजे सगेसोयरे. यामध्ये फक्त सजातीय विवाहातून तयार  झालेले नातेसंबंधांचाच समावेश आहे.

इतर मागण्याही मान्य

१. संपूर्ण मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार

२. कुणबी नोंदी शोधणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीला काम पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्याने मुदतवाढ.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics