मराठा आरक्षणावरुन भुजबळ आक्रमक; सगे-सोयरेंची अधिसूचना रद्दची मागणी

मुंबई : मराठा समाजात कुणबीच्या नोंदी नसणाऱ्यांनाही सगे-सोयऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. त्याला ओबीसींचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (chagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. ही अधिसूचना तातडीने रद्द करावी, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde) काढलेल्या अधिसूचनेविरोधात सर्व ओबीसी नेत्यांची बैठक २८ जानेवारी रोजी मुंबईत छगन भुजबळ (chagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात झाली. त्यात प्रामुख्याने तीन ठराव मंजूर करण्यात आले.

conflict between Eknath Shinde and Bhujbal

  • सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सगे-सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी.
  • कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी नेमलेली न्या. शिंदे समिती असंविधानिक असून ती रद्द करण्यात यावी. तसेच त्यांनी शोधलेल्या नोंदींच्या आधारे सुरू केलेले कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) वाटप थांबवण्यात यावे.
  • आरक्षणाबाबत आसक्ती असलेले निवृत्त न्या. सुनील सुक्रे, ओमप्रकाश जाधव, प्रा.अंबादास मोहिते यांची राज्य मागासवर्ग आयोगावरील (State Backward Commission) नियुक्ती रद्द करण्यात यावी.

अहमदनगरमध्ये एल्गार मेळावा (OBC Elgar Rally in Ahmednagar)

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) देण्यास आमचा विरोध नाही. मात्र त्यांना ५४ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करुन सरकार ओबीसींच्या तोंडचा घास हिरावून घेत आहे. त्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्धार भुजबळांकडील (chagan Bhujbal) बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यासाठी १ फेब्रुवारीला प्रत्येक तालुका, जिल्ह्यात आमदार, खासदार, तहसील कार्यालयासमोर आंदोलने करुन ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यात येणार आहे. तसेच ३ फेब्रुवारी रोजी अहमदनगरमध्ये एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यभर ओबीसींची यात्रा काढणार असल्याची माहितीही भुजबळांनी (chagan Bhujbal) दिली.

अधिसूचनेविरोधात आक्षेपांचा पाऊस पाडा

सगे-सोयरेंबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर (Maratha Reservation Notification) १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप, हरकती मागवण्यात आल्या आहेत. आम्ही लाखो हरकती दाखल करणार आहोत. ओबीसी समाजातील तज्ञांनी व सर्वांनी हे आक्षेप दाखल करावेत, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics