आता मराठ्यांचा इंगा दाखवाच… म्हणत मनोज जरांगे यांनी ‘आपले’च उमेदवार निवडून आणण्याचा दिला कानमंत्र

शंभरावर उमेदवार उभे करण्यापेक्षा एकच उभा करा, त्याला निवडून आणा; जरांगेंचे आवाहन

Maratha society’s warning against the government- Manoj jarange patil

आंतरवली सराटी (जि. जालना) : मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण Maratha Reservation देण्यात आलेले अपयश, सगेसोयऱ्यांच्या अटीची पूर्तता होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील Manoj jarange patil  यांनी राज्यातील महायुती सरकारला आगामी निवडणुकीत इंगा दाखवण्याचा संदेश २४ मार्च रोजी हजारो मराठा बांधवांना दिला.

सुमारे ८ महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील Manoj jarange patil  यांनी उपोषण, आंदोलन करुनही सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २४ मार्च रोजी आंतरवली सराटी येथे निर्णायक बैठक घेण्यात आली. त्यात आता ‘मागणारे नव्हे तर देणारे व्हा’ असे संदेश देऊन आगामी निवडणुकीत आपलेच उमेदवार निवडून आणण्याचा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला.

Maratha society’s warning against the government- Manoj jarange patil

आता शंभरावर नव्हे एकच उमेदवार Manoj Jarenge Patil’s Election Stratergy

लोकसभा निवडणुकीत सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज भरण्याची रणनीती मराठा समाजाने आखली होती. त्यामुळे सरकारला बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्या लागतील, अशी त्यामागे कल्पना होती. पण काही तज्ञांनी हा प्रकार आपल्या फायद्याचा नसल्याचे जरांगे यांना पटवून सांगितले. उलट मराठा मतांचे विभाजन होऊन दुसऱ्यांचाच फायदा होईल, याचीही जाणीव करुन दिली. हा सल्ला पटल्यामुळे जरांगे यांनी आता शेकडो नव्हे तर आपला एकच उमेदवार द्या व त्याला निवडून आणा, असा सल्ला मराठा बांधवांना दिला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी लढणारा उमेदवार निवडून देऊ, असा निर्धार सर्वांनी केला. समाजाच्या या निर्णयाचा सत्ताधारी नेत्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Maratha society’s warning against the government- Manoj jarange patil

लोकसभा नव्हे विधानसभा टार्गेट Mission Vidhansabha

मी निवडणूक लढवणार नाही, असा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला. लोकसभा निवडणुकीत आपले काम नाही. कारण तिकडे आपले कुणी एेकत नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचे काम राज्य सरकारचे आहे. त्यामुळे आपण लोकसभेएेवजी विधानसभा निवडणुकीत लक्ष द्यायला हवे, असे जरांगे म्हणाले. याचा अर्थ, विधानसभा निवडणुकीतही मराठा समाज सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार हे आता स्पष्ट झाले आहे.

१७ मतदारसंघात मराठ्याचे वर्चस्व Maratha dominance in 17 constituencies

जरांगे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील किमान १७ ते १८ मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. शंभर टक्के हे खरं आहे, इथे कुणाचाही कार्यक्रम होऊ शकतो. मी म्हणणार नाही की, ४८ मतदारसंघ मराठ्यांचे आहेत. पण, मराठा बहुल जवळपास १७ ते १८ मतदारसंघ आहेत. तिथे तुमच्याशिवाय दुसरे कुणीच निवडून येऊ शकत नाही आणि जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला तर बाकीचे दलित मुस्लीम बांधवही तुमच्यासोबत राहतील  पण, आपला विषय केंद्रात नाही. आपला विषय राज्यात आहे. आपल्या गुन्हे राज्य सरकार दाखल करत आहे. राज्य सरकार आपल्याला आरक्षण देत नाही. म्हणून विधानसभेवरही लक्ष केंद्रीत करा, असे जरांगे म्हणाले.

जरांगेंनी दिले दोन पर्याय
Jarange Patil gave two options

गावागावांतून अनेक उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल. त्यामुळे आपापल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घ्या. सर्व जाती धर्माचा  एकच उमेदवार निश्चित करा आणि त्याला अपक्ष निवडणूक लढवायला लावा, हा एक पर्याय जरांगेंनी सर्वांसमोर ठेवला.

दुसरा पर्याय म्हणजे, सगेसोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार लेखी बॉण्ड करून पाठिंबा देईल, त्याला पाठिंबा द्या. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. असे दोन पर्यायही जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत. मात्र उपस्थित लोकांनी बॉन्डवरील हमीचा पर्याय स्वीकारण्यास नकार दिला. त्याएेवजी सर्वानुमते आपलाच उमेदवार उभा करु व निवडून आणू असे सर्वानुमते ठरले. याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा राहिल व तो सत्ताधाऱ्याला किंवा विद्यमान खासदारासाठी मोठे आव्हान उभे करेल, असे संकेत यातून मिळत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics