मविआचे अखेर ठरले; उद्धव सेना व काँग्रेसला प्रत्येकी २० जागा, राष्ट्रवादीला फक्त आठच

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे जागावाटप आता जवळपास अंतिम झाले आहे. ९ जानेवारी रोजी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनुसार, महाराष्ट्रातील ४८ पैकी २०-२० जागा उद्धव सेना व काँग्रेसला मिळू शकतील. तर शरद पवार (sharad pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र केवळ ८ जागांवरच समाधान मानावे लागेल.

काँग्रेसचे नेते मुकूल वासनिक यांच्या दिल्लीतील बंगल्यावर ९ जानेवारी रोजी रात्री बैठक झाली. त्यात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole), राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड (jitendra awahd) व उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत  (sanjay raut) आदी उपस्थित होते.

उद्धव सेनेने आधी २३ जागांवर दावा केला होता. मात्र ते २० जागांपर्यंत तडजोडीस तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आमच्यात कुठलीहे वाद नसल्याचे सांगून याबाबत पुष्टीही दिली.

वंचितला सोबत घेण्यास तयार

प्रकाश आंबेडकर (prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यास अखेर काँग्रेसने हिरवा कंदिल दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र वंचितची आधीपासूनच उद्धव सेनेशी युती असल्याने त्यांनी आपल्या २० जागांच्या कोट्यातून वंचितला जागा द्याव्यात, असे ठरले. त्यानुसार उद्धव सेना (udhav Thackeray) वंचितला एखाद- दुसरी जागा देऊ शकते.

राजू शेट्टींचे काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju shetty) यांनाही सोबत घ्यावे, या मतप्रवाहावर बैठकीत चर्चा झाली. शेट्टी यांना केवळ एकच हातकणंगले मतदारसंघ द्यायचा आहे, त्या बदल्यात त्यांच्या संघटनेचा पाठिंबा पश्चिम महाराष्ट्रात मिळवता येईल असे यावेळी सांगण्यात आले. मात्र शेट्टी यांना कोणत्या कोट्यातून जागा द्यायची हे नक्की झाले नाही. पण जर वंचितची जबाबदारी उद्धव सेनेने घेतली तर राजू शेट्टींची जबाबदार काँग्रेसला घ्यावी लागू शकते.

काही जागांची अदलाबदल

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी कोणता मतदारसंघ कुणी लढवायचा हे मात्र स्पष्ट झालेले नाही. आता १५ जानेवारीनंतर शरद पवार (sharad pawar), उद्धव ठाकरे (udhav thackeray), मल्लिकार्जुन खरगे (kharge) हे पक्षाध्यक्ष एकत्र बसतील व त्याबाबतचा निर्णय घेतील. काही जागांच्या बदलाबदलही केली जाईल. त्यासाठी चर्चेच्या दोन- तीन फेऱ्या होऊ शकतात. जानेवारीअखेरपर्यंत मात्र कोणते मतदारसंघ कोण लढवणार हे निश्चित होईल असे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics