Prakash Ambedkar left Maviya’s support
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ सुरु असलेली वंचित बहुजन आघाडी Vanchit Aaghadi हा पक्ष महाविकास आघाडीसोबत Mahavikas Aaghadi येणार असल्याच्या चर्चांना अखेर २४ मार्च रोजी पूर्णविराम मिळाला. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा करत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. Prakash Ambedkar will file his Form inAkola on March 26. त्यामुळे महाविकास आघाडीला ८ ते १० मतदारसंघात फटका बसू शकतो.
भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून महाविकास आघाडीत येण्यास आपण उत्सुक असल्याचे दाखवले होते. काँग्रेस- राष्ट्रवादीशी त्यांचे पूर्वीपासूनच फारसे सख्य नसल्याने त्यांनी आधी उद्धव ठाकरेंशी Udhav Thackeray हातमिळवणी केली. त्यानंतर ठाकरेंनी त्यांच्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे लॉबिंग केली. हे सगळे होत असताना प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांविरोधात मात्र वक्तव्ये करत होते. यातून त्यांना आघाडीत यायचे की नाही? असा प्रश्न निर्माण होत होता.
जागावाटपात डावलल्याचा भावना
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत सुरुवातीला वंचित आघाडीला सामावून घेण्यात आले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव सेनेच्या नेत्यांनी आधी प्राथमिक चर्च केली व नंतर वंचितच्या प्रतिनिधींना चर्चेत सहभागी करुन घेणे आले. मात्र सुरुवातीपासूनच वंचितच्या प्रतिनिधींचा जुळवून घेण्याकडे कल दिसला नाही. प्रत्येक बैठकीनंतर बाहेर येऊन ते आम्हाला डावलले जात असल्याची भावना जाहीरपणे व्यक्त करत होते.
आधी महाविकास आघाडीने वंचितला दोनच जागा देऊ केल्या होत्या. घासाघासीत ४ मतदारसंघ सोडण्यापर्यंत उदारता दाखवण्यात आली. पण वंचित ७ जागांवर ठाम राहिला. त्यामुळे मविआचे व त्यांचे काही जमले नाही. मात्र आपल्याकडून चर्चेची दारे बंद झाली असा मेसेज न जाऊ देण्याची हुशारी मविआने दाखवली. अजूनही ते प्रकाश आंबेडकरांशी चर्चेस तयार असल्याचे सांगत आहेत. मात्र आता २४ मार्च रोजी प्रकाश आंबेडकरांचा संयम सुटला व त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
चार जागा तुम्हालाच लखलाभ Vanchit Rejected MVA’s Offer
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीने आम्हाला ४ जागा देऊ केल्या होत्या. त्या त्यांनीच ठेऊन घ्याव्यात. मुळात मविआमध्ये १५ मतदारसंघांवरुन भांडण सुरु आहे, ते मिटत नसल्याने वंचितला किती जागा द्यायच्या, याचा निर्णयच ते घेऊ शकत नाहीत. माध्यमांसमोर ते आम्हाला ४ जागा देणार असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात अकोला व इतर दोन अशा तीनच जागांविषयी ते बोलत आहेत. त्यामुळे आधी मविआच्या नेत्यांनी खोटे बोलणे थांबवावे, असे आंबेडकर म्हणाले.
वंचित स्वतंत्र लढला तर भाजपला फायदा, मविआला फटका Vanchit Aghadi BJP’s B team
वंचित आघाडी स्वतंत्र लढली तर महाविकास आघाडीला किमान ८ ते १० जागांवर फटका बसणार यात शंका नाही. २०१९ च्या निवडणुकीत हेच झाले. एमआयएमशी युती करुन वंचितने सर्व जागा लढवल्या. त्यात ८ मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांनी दीड लाख ते ३ लाखांपर्यंत मते घेतली. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. यात नांदेडमधून अशोक चव्हाण, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनाही वंचितमुळे पराभूत व्हावे लागले. यावेळीही वंचित स्वतंत्र लढला तर मतांच्या फाटाफुटीत भाजपचा फायदा होणार, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांना भाजपची ‘बी टीम’ म्हटले जाते. आंबेडकरांनी मात्र वेळोवेळी या आरोपाचे खंडन केले आहे.
आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी : संजय राऊत
युती तुटल्याचा प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत sanjay Raut यांनी केली. त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही राऊतांनी केले. प्रकाश आंबेडकरांशी शिवसेनेची वर्षभरापूर्वी युती झाली. ठाकरे- आंबेडकर एकत्र आल्याचा महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला होता. त्यामुळे आंबेडकरांनी युती तोडण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. जागावाटपाची चर्चा करताना काही गोष्टी पुढे- मागे होत असतात. त्यावर चर्चेतून मार्ग काढता येतो. मात्र असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रकाश आंबेडकरांशी अजूनही सकारात्मक चर्चा होऊ शकते, असे सांगितले.