प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीच्या प्रवेशाला पूर्णविराम; खासदार संजय राऊतांकडूनही सुतोवाच
वंचितला हव्या होत्या ७ जागा, मविआकडून ४ जागांची तयारी, म्हणून फिसकटली बोलणी
मुंबई : भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी साद घालणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar हे मात्र महाविकास आघाडीत जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते चंद्रशेखर राव यांच्याशी वाटाघाटी सुरु केल्या आहेत.
महाविकास आघाडीची २१ मार्च रोजी मुंबईत शरद पवार यांच्या घरी बैठक झाली. त्यात उद्धव सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते उपस्थित होते. वंचितच्या प्रतिनिधींची गैरहजेरी का? या प्रश्नावर खासदार संजय राऊत sanjay Raut म्हणाले, ‘आम्ही प्रकाश आंबेडकरांना ४ जागा देऊ केल्या होत्या. पण ते ७ जागांवर आग्रही आहेत. त्यांनी मविआचा प्रस्ताव मान्य केला असता तर बरे झाले असते, पण बाळासाहेबांची वेगळी भूमिका दिसत आहे. देशातील हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला नक्कीच बळ मिळाले असते,’ असे राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता वंचित व मविआ यांच्यातील चर्चेचे दारेही बंद झाली असल्याचे संकेत मिळत आहेत.
वंचितने आधीच दिले होते संकेत Vanchit supports Congress in 7 seats
दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर prakash Ambedkar यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. त्यात उद्धव सेना व राष्ट्रवादी काँग्रेसशी आमची सकारात्मक चर्चा होत नाहीए. तरीही काँग्रेसला आम्ही ७ जागांवर पाठिंबा देण्यास तयार आहोत. तुम्ही हे ७ मतदारसंघ आम्हाला कळवावेत,’ असे पत्रात नमूद करुन आंबेडकरांनी गूगूली टाकली होती. मात्र अद्याप काँग्रेसने त्यांना उत्तर पाठवलेले नाही. आंबेडकरांना सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत, असे मविआचे नेते माध्यमांना सांगत आहेत. मात्र आता त्यात फारशा आशा राहिलेल्या दिसत नाहीत. वंचितशिवाय मविआ आपले उमेदवार एक- दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे कळते.
या मतदारसंघात काँग्रेसला होऊ शकतो फायदा Congress can benefit in this constituency
२०१९ च्या निवडणुकीतही वंचित आघाडीने आधी काँग्रेस आघाडीशी चर्चेचे नाटक केले, नंतर मात्र त्यांनी एमआयएम सोबत जाऊन स्वतंत्र आघाडी केली. त्यामुळे ८ मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचितमुळे पराभव पत्कारावा लागला होता. कारण या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना दीड लाख ते ३ लाखांपर्यंत मते पडली होती. त्यामुळे यावेळी प्रकाश आंबेडकरांची ऑफर जर काँग्रेसने स्वीकारली तर त्यांना सांगली, नांदेड, सोलापूर, अमरावती, शिर्डी, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघात वंचितच्या मदतीचा फायदा होऊ शकतो.
…पण आंबेडकरांच्या भूमिकेवर शंका,
ते ‘भाजपचा बी प्लॅन’ असल्याचा आरोप Prakash Ambedkar BJP’s B plan
२०१९ मध्ये आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फाटाफूट केल्याचा फायदा भाजप- शिवसेनेला झाला होता. त्यामुळे ८ मतदारसंघात आघाडीचा पराभव झाला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे भाजपचा बी प्लॅन असल्याची टीका केली जाते. यावेळीही सुरुवातीपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेवून एेन उमेदवार निवडीच्या वेळी वंचितने महाविकास आघाडीपासून अंतर राखल्याचे दिसते. वंचितने यावेळीही स्वतंत्र उमेदवार उभे केले तर मविआला त्याचा फटका बसेल व अप्रत्यक्षरित्या भाजप व महायुतीच्या उमेदवारांचा फायदा होईल. Prakash Ambedkar BJP’s B plan.
प्रकाश आंबेडकरांची यंदाही हीच खेळी असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. म्हणून त्यांच्या ७ जागांवर पाठिंब्याच्या आमिषाला काँग्रेस भुलणार नाही. मदतच करायची असेल तर मविआत या, असा संदेश काँग्रेसकडून वंचितला पाठवला जाण्याची शक्यता आहे.