दिल्लीहून आल्यापासून गप्प असलेले राज ठाकरे उद्या मौन सोडणार; भाजपशी युती करायची की नाही पाडवा मेळाव्यात जाहीर करणार

अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील शिवाजी पार्कच्या मैदानावर उघड करणार

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray. निवडणुका आल्या की त्यांची तोफ धडाडत असते. सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनातील मुद्द्यांना ते हात घालतात, त्यामुळे त्यांची भाषणे एेकण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी होत असते. त्यांचे मुद्दे सर्वांना पटतातही. पण जे बोलतात ते करण्यात मात्र राज कधीही पुढे नाहीत. तसेच एका भूमिकेवर कधी टिकूनही राहात नाहीत. मग तो टोलचा मुद्दा असो, मराठी युवकांच्या नोकऱ्यांचा मुद्दा असो की परप्रांतीयांचा मुद्दा असो. राज ठाकरेंनी प्रत्येक वेळी आधी आक्रमक व नंतर तडजोडीची भूमिका स्वीकारली. अगदी सुरुवातीला नरेंद्र मोदी यांचे तोंड भरुन कौतुक करणाऱ्या राज यांनी २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांपेक्षाही जास्त तीव्रतेने मोदी सरकारवर टीका केली. त्यांचे ‘लाव रे ते व्हिडिओ’च्या भाषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र त्याचे मतात रुपांतर होऊ शकले नाही. अशा बदलत्या भूमिकांमुळेच मराठी माणसाचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज ठाकरे Raj Thackeray पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis, एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे व राज ठाकरे Raj Thackeray यांचे राजकीय शत्रू एकच आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे Udhav Thackeray.
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार झाले याचा चुलत भाऊ असूनही राज ठाकरेंना खूप आनंद झाला. या दोन वर्षात त्यांच्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याशी गाठीभेटी, गुफ्तगूही वाढल्या. शिवसेना पक्षावर ताबा मिळाला, महाराष्ट्राची सत्ताही मिळाली तरी ‘ठाकरे’ ब्रॅन्ड सोबत नसल्याने महाराष्ट्राचे जनमत काही आपल्या पाठीशी नसल्याची उशिरा का होईना शिंदे- फडणवीसांना जाणीव झाली. आणि म्हणूनच त्यांनी राज ठाकरे यांना महायुतीत सामील करुन घेत ‘ठाकरे ब्रॅन्ड’ही ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत या ब्रॅन्डचा उद्धव ठाकरेंविरोधात फायदा करुन घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

मनसे महायुतीत येणार का?

गेल्या अनेक दिवसांपासून मनसेला महायुतीत घेण्याच्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार यांच्यामार्फत तसे प्रयत्न सुरु होतेे. नंतर सत्तेच्या मोहापायी राज ठाकरे यांनीही त्यांनी अनूकूल प्रतिसाद दिला. आता कोणत्याही क्षणी राज ठाकरे युतीत येतील अशा चर्चा सुरु झाल्या. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरेंकडून हिसकावून घेतलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुखपदही त्यांना दिले जाऊ शकते, Raj Thackeray will be New Shiv sean Pramukh?  अशा वावड्या उठवण्यात आल्या, पण त्या काही दिवसांतच फोल ठरल्या.
राज ठाकरेंच्या मनसेला युतीत घेण्यासाठी दिल्लीचे भाजप नेतेही उत्सुक आहेत. त्यासाठीच १९ मार्च रोजी राज ठाकरेंची दिल्लीत अमित शाह Amit Shah meeting With Raj Thackeray यांच्यासोबत गोपनीय बैठक घडवून आणण्यात आली. मात्र प्रत्येक गोष्टीवर परखड बोलणारे राज दिल्लीहून आल्यानंतर मात्र अक्षरश: मौनात गेले आहेत, याचे महाराष्ट्राला आश्चर्य वाटते. राज ठाकरे व अमित शाह यांच्या भेटीत नेमके असे काय झाले की राज यांची बोलती बंद झाली? याचे कोडे कोणालाच उलगडत नाहीए.

काय झाले बैठकीत

अमित शाह Amit Shah यांनी राज Raj Thackeray यांना युतीत सहभागी होण्याची ऑफर दिली. त्याबदल्यात लोकसभेची एक जागा देण्याचेही कबूल केले. मात्र अशा छोट्या ऑफरला राज ठाकरे भुलले नाहीत. अमित शाह यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंना बंद खोलीत दिलेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द नंतर फिरवला, असा आरोप उद्धव यांनी केला. यात किती खरे अाणि किती खोटे हे अमित शाह अन‌् उद्धवच जाणोत. मात्र या घटनेपासून धडा घेत भाजपच्या नेत्यांशी कसे वागायचे हे मात्र राज ठाकरे शिकले. म्हणूनच केवळ लोकसभेची नाही तर विधानसभा, मुंबई मनपा निवडणुकीत मनसेला काय मिळेल? याचे आताच ठरवून घ्या व त्याबाबत लेखी करार करा, अशी अट त्यांनी अमित शाह यांना घातली. पण शाह काही त्याला तयार झाले नाहीत. आता लोकसभेचे बोलू, विधानसभेचे तुम्ही राज्यातील नेत्यांशी बोला, असे सांगून अमित शाह यांनी राज यांना वाटी लावले.
इकडे मुंबईत आल्यावर २० मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis व राज ठाकरे Raj Thackeray यांची सुमारे तासभर एका हॉटेलातील बंद खोलीत चर्चा झाली. त्याचा तपशील मात्र जाहीर करण्यात आला नाही. दिल्लीत ठेवलेल्या अटींबाबत राज यांनी तिथे माहिती दिली असावी व त्यांच्या अटी मान्य करणे शिंदे- फडणवीसांच्या हाती नसल्याने त्यांनीही हतबलता व्यक्त केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या दोन्ही बैठकांनंतर राज ठाकरे कुठेही काहीच बोलले नाहीत की लोकसभा निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल हेही त्यांनी आतापर्यंत जाहीर केलेले नाही. त्यांच्या या मौनामागे काय गूढ लपले आहे याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

मनसेने मागितलेल्या जागांवर युतीने दिले उमेदवार
Bjp alliance gave candidates on the seats demanded by MNS

मनसेने महायुतीत येण्यासाठी नाशिक, शिर्डी व मुंबईतील एक या तीन मतदारसंघांपैकी किमान दोन जागा मिळाव्यात, अशी अट ठेवली होती. शिर्डीतून किंवा मुंबईतून राज यांचे निकटर्तीय बाळा नांदगावकर Bala Nandgaokar यांना उमेदवारी देण्याचेही ठरले होते. मात्र राज ठाकरे दिल्लीतून आल्यानंतर बरेच दिवस काहीच प्रतिसाद देत नसल्याने शिंदेसेनेने आपल्या वाट्याला आलेल्या शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली. The alliance gave candidates on the seats demanded by MNS. नाशिक मतदारसंघ शिंदेसेनेकडून आपल्या ताब्यात घेण्यास अजित पवारांच्या Ajit Pawar’s Ncp राष्ट्रवादीला यश आले आहे. तिथे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ Changan Bhujbal यांची वर्णी लागण्याची दाट शक्यताआहे. त्यामुळे मनसेने दावा केलेले तीन पैकी दोन मतदारसंघाची संधी तर हुकली. आता राहिला मुंबईतील एका जागेचा प्रश्न. मुळात मुंबईतील सहापैकी पाच जागांवर भाजपनेच दावा केला आहे तर एक जागा शिंदेसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे मनसेने दावा केलेल्या तिन्ही जागांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे ते महायुतीत येणार की नाही? याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

गुढीपाडवा मेळाव्यात पत्ते खोलणार What will Raj Thackeray say in Gudipadwa Rally?

राज ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळावा Mns’s Gudi Padwa Rally on Shivaji Park घेतात. यावेळी ९ एप्रिल रोजी ते हा मेळावा घेणार आहेत. त्यात महायुतीत सहभागी होण्याविषयी व अमित शाहच्या भेटीत झालेल्या चर्चेविषयी मनसेची काय भूमिका असेल याचे गुपित ते उघडतील, अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.
लोकसभेची एखाद- दुसरी जागा देऊन भाजप मनसेला स्वस्तात गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे न कळण्याएवढे राज ठाकरे अडाणी नाहीत. लोकसभेत मनसेचा मुंबईत उपयेाग करुन घ्यायचे व नंतर सोडून द्यायचे, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची संभाव्य खेळी त्यांच्या केव्हाच लक्षात आली होती. त्यामुळेत आता केवळ चर्चेत घासाघीस करुन महायुतीत आपले स्थान ठरवायचे नाही तर गुढी पाडवा मेळाव्याला विक्रमी गर्दी जमवून राज ठाकरे काय चीज आहे, हे दिल्लीत बसलेल्या भाजप हायकमांडला दाखवून द्यायचे असा निर्धार मनसैनिकांनी यावेळी केला आहे. या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडतात, यावर त्यांची राजकीय वाटचाल कळेल. मात्र त्यांनी मोदी- शाह यांना अनुकूल भाषण केले तरी भाजप देईल ते स्वीकारुन गपगुमान महायुतीत सहभागी होणारे राज ठाकरे नाहीत. अन‌् मोदींच्या कारभारावर टीका केली तरी ते भविष्यात महायुतीत जाणारच नाहीत, असेही नाही. एक मात्र खरे की, मरगळ आलेल्या मनसेला सत्तेचा परिसस्पर्श करुन देण्याची पक्षस्थापनेनंतर प्रथमच जी संधी चालून आली आहे ती राज ठाकरे व्यर्थ जाऊ देणार नाहीत,

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics