Rajyasabha Election : अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने १४ फेब्रुवारी रोजी आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. नुकतेच काँग्रेसमधून पक्षात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan (नांदेड), डॉ. अजित गोपछडे Dr. Ajit Gopchade (नांदेड) व माजी आमदार मेधाताई कुलकर्णी Medhtai Kulkarni (पुणे) यांना पक्षाने संधी दिली आहे.

Rajyasabha-election-Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr. Ajit Gopchade Bjp’s Candidate

महाराष्ट्रात राज्यसभेवर ६ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यापैकी काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे Chandrakant Handore यांची तर भाजपने तिघांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेसेना व अजित पवार गट यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. त्यांची नावे आजच जाहीर होऊ शकतात. सहा जागांसाठी सहाच उमेदवार मैदानात उतरले तर या सर्वांची बिनविरोध निवड होऊ शकते. त्यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर मात्र २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. विधानसभेच्या सदस्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे.

राणे, जावडेकरांचा पत्ता कट

निवृत्त राज्यसभा सदस्यांमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे Naranya Rane, माजी मंत्री प्रकाश जावडेकर Prakash jawdekar आणि व्ही. मुरलीधरन (केरळ) V. Murlidhran यांचा समावेश होता. मात्र यावेळी पक्षाने राणे, जावडेकरांना संधी नाकारली, तसेच परराज्यातील उमेदवार देणेही टाळले.

सूत्रांच्या माहितीनुसार, राणे यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा लढवण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांना पुन्हा पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे.

एकाच जिल्ह्यात दोन खासदार

राज्यसभेची उमेदवार मिळण्याच्या अटीवरच अशोक चव्हाण भाजपात आले. त्यामुळे त्यांना संधी देणे क्रमप्राप्तच होते. मात्र अशोक चव्हाण सारख्या आयात नेत्यांना पक्षात आल्याआल्या मोठी पदे मिळतात आणि अनेक वर्षे भाजपसाठी ‌झटणारे निष्ठावंत मात्र दुर्लक्षितच राहतात अशी भावना पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. विशेषत:  वर्षानुवर्षे नांदेड जिल्ह्यात चव्हाणांशी संघर्ष करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांत ही भावना वाढत आहे. हा रोष कमी करण्यासाठी राज्यसभेची दुसरी उमेदवारही नांदेड जिल्ह्यातील भाजपचे निष्ठावंत डॉ. अजित गोपछडे यांना जाहीर करण्यात आली.

२०१९ च्या निवडणुकीत आमदार मेधाताई कुलकर्णी यांना भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी त्यांचा कोथरुड मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी चंद्रकांतदादांच्या जागी विधान परिषदेवर आपली वर्णी लावली जाईल, असे आश्वासन मेधाताईंना पक्षाने दिले होते. मात्र ५ वर्षे उलटत आली तरी भाजपने हे आश्वासन पाळले नव्हते. त्यामुळे मेधाताई नाराज होत्या. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी कधी पक्षात तर कधी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. मेधाताईंना डावलल्यामुळे पुण्यात ब्राह्मण समाजातही भाजपविरोधात नाराजी वाढत होती. कसबा पोटनिवडणूकीत भाजपच्या पराभवामागे तेही एक कारण सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर लोकसभेत पुण्यात ब्राह्मणांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपने मेधाताईंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

कोण आहेत डॉ. गोपछडे

भाजपकडून नांदेड या एकाच जिल्ह्यात दोन उमेदवारांना संधी देण्यात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यातही दुसरे उमेदवार डॉ. अजित गोपछडे महाराष्ट्राला फारसे परिचित नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत अनेक वर्षे काम केलेले डॉ. गोपछडे गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. नायगाव विधानसभा मतदासंघात त्यांनी तयारीही सुरु केली होती. अनेक वर्षे पक्षात निष्ठावानपणे काम केल्याचे फळ भाजपने अखेर त्यांना राज्यसभेच्या रुपाने दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics