वंचित बरखास्त करुन रिपाइंत या, पक्षाध्यक्षपद व केंद्रीय मंत्रिपदही देतो

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे. त्यामुळे आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष भाजप व ‘एनडीए’सोबत आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त (VBA) करुन रिपब्लिकन (RPI) पक्षात यावे. मी त्यांना पक्षाचे प्रमुखपद व केंद्रात माझे मंत्रिपद देण्यास तयार आहे, अशी ऑफर रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली.

दरम्यान, रिपाइंचा देशभर एनडीएला पाठिंबा आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला महाराष्ट्रात २ मतदारसंघात एनडीएची उमेदवारी देण्यात यावी, अशी अपेक्षाही आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन करताना आठवले म्हणाले, ‘ओबीसी किंवा इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा. तमिळनाडूने वेगवेगळी वर्गवारी करून ६९% आरक्षण दिले. तसेच महाराष्ट्रातही मराठा समाजासाठी स्वतंत्र वर्गवारी करून आरक्षण देण्याची गरज आहे.

रिपाइंला एकतरी मंत्रिपद द्या

राज्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, ‘अजितदादा महायुतीत येताच लगेच विस्तार होऊन त्यांच्या पक्षाला मंत्रिपदे देण्यात आली. मात्र आमचा मंत्रिमंडळ विस्तार मात्र अजूनही रखडलेला आहे. इतकी वर्षे भाजपला साथ देणाऱ्या रिपाइंला आता राज्यात किमान एक तरी मंत्रिपद द्यावे, अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics