रोहित पवारांच्या वडिलांचा अजितदादांना टोला; तेव्हा मी कुटुंबात दुरावा निर्माण होऊ दिला नाही!

शरद पवारांचा शब्द पाळून कारखाना निवडणुकीत उभे न राहिल्याची आठवण करुन दिली

बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Leader) Ajit Pawar) यांनी आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बंड करुन भाजपशी हातमिळवणी करुन सत्ता मिळवली. इतकेच नव्हे तर काकांनी स्थापन केलेल्या पक्षावर कब्जाही मिळवला. एवढ्यावरच न थांबता बारामती लोकसभेत चुलत बहिण सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आपल्या बायकोला सुनेत्राताईला (Sunetra Ajit Pawar) निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी त्यांनी केली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाला बारामतीत धक्का देण्यासाठी भाजप (BJP) अजितदादांच्या माध्यमातून सर्व डावपेच खेळत आहे. त्यामुळे दादांविरोधात बारामतीत (Baramati Loksabha) संतापही व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार घराण्यातील वादात पत्रप्रपंचाचीही भर पडली आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar’s Letter to Public) यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्यात आपण विकास मार्गावर जाण्यासाठी भाजपशी हातमिळवणीचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. वडिलधाऱ्यांचा अनादर करण्याचा किंवा कुणाच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचा आपला उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे दुसरे पुतणे व आमदार रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनीही आपली बाजू मांडून दादांचे मुद्दे अप्रत्यक्षपणे खोडून काढले.

मी तेव्हा घरात फूट टाळली

राजेंद्र पवार म्हणाले, ‘शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतच अजित पवार राजकारणात दाखल झाले. त्याच वेळी मीदेखील दोनदा छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत रस दाखवला होता. मात्र, शरद पवारांनी मला दोन्ही वेळा रोखले. मी त्यांचा शब्द पाळला व निवडणुकीस उभे राहिलो नाही. नाही तर तेव्हाच आमच्या कुटुंबात फूट पडली असती. मतदारसंघातील अनेक लोक त्यांच्या वडिलधाऱ्यांपासून पवार कुटुंबीयांसोबत आहेत. कुटुंबातील वाद टाळण्यासाठीच रोहित पवार हाही नगर जिल्ह्यात निवडणूक लढण्यास गेले’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुनेत्रा वहिनींच्या लोकसभा लढण्याविषयी लोकांमध्ये संभ्रम असल्याचेही राजेंद्र पवार म्हणाले.

anonymous letter to reply Ajit Pawar
निनावी पत्रातून दादांना इशारा, “वाजवा तुतारी गाडा गद्दारी…”

अजित पवार यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्राला काउंटर करणारे एक निनावी पत्र anonymous letter to reply Ajit Pawar दोन दिवसांनीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याची सुरुवातच ‘बारामतीकरांची भूमिका’ या शीर्षकाने होती. त्यातून सुप्रिया (Supriya Sule), रोहित पवार (Rohit Pawar) गटाच्या बाजूने संदेश देण्यात आला आहे. शरद पवारांनी तिसऱ्या पिढीसाठी पार्थऐवजी (Parth Pawar) रोहित पवारांची निवड केल्यापासून पवार कुटुंबातील अंतर वाढत गेल्याचे यात म्हटले आहे. अजितदादा पवारांनी हे प्रकरण विनाकारण भावकीच्या तालावर आणून ठेवलंय. सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या (सुनेत्रा पवारांच्या माहेरी) काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या,’ असा टोला लगावण्यात आला आहे. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, “वाजवा तुतारी गाडा गद्दारी…” असा इशारा पत्राच्या शेवटी अजितदादांना देण्यात आला आहे. हे पत्र निनावी असले तरी ते शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar) व्हायरल करण्यात आल्याचा संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics