मुंबई : बेकायदा सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह शिवसेनेशी गद्दारी करणारे १६ आमदारांना पात्र ठरवणारा विधानसभा अध्यक्षांचा निकाल राज्यघटनेविरोधी आहे, अशी टीका उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली. शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार राहुल नार्वेकरांना (rahul narwekar) नाही. त्यांच्या घटनाविरोधी निर्णयाने लोकशाहीची हत्या झाली आहे, असे राऊत म्हणाले. लोकशाहीला श्रद्धांजली असा फोटो असलेले एक ट्विटही त्यांनी केले आहे.
श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का?
नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताा शिवसेेनेत घराणेशाहीचा अंत झाला अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचा समाचार घेताना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा. त्यांच्या मुलाचे पक्षात काय योगदान होते? बाळासाहेब, शरद पवार यांच्या पक्षात कधीच घराणेशाही नव्हती. विचार पुढे नेणारा हा एक मार्ग असतो. लोकांना पटले तर ते स्वीकार करतात नाहीतर नाकारतात.
नार्वेकरांवर टीका
खासदार राऊत म्हणाले, ‘याा खटल्यात राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकिल म्हणूनच काम केले. मॅच फिक्सिंग करुन त्यांनी निकाल दिला. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले नाही. पण जनतेच्या मनात चीड आहे.’