भाजपच्या बाराव्या यादीत उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी, महायुतीचे अजून ९ उमेदवार वेटिंगवरच
Satara Loksabha- Udayan Raje is Bjp's candidate राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी होणार लढत
Satara Loksabha- Udayan Raje is Bjp’s candidate
मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले Udyan Raje Bhosale यांना अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. १६ एप्रिल रोजी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या १२ व्या यादीत राजेंचे नाव आले आहे. तत्पूर्वीच त्यांनी प्रचार सुरु केला होता. आता १८ एप्रिल रोजी राजे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी नुकताच जोरदार शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला आहे. राजे व शिंदे यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभेत २००९ पासून सातत्याने ५ टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार इथून निवडून येत होता. मात्र त्यापूर्वी १९५२ पासून म्हणजे पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून इथे काँग्रेसचाच खासदार निवडून आला. अपवाद फक्त १९९१ चा. त्यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर हिंदूराव नाईक निंबाळकर विजयी झाले होते. अगदी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर सहाच महिन्यात उदयनराजेंनी खासदारकीचा व पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला, तेव्हाच्य प्रतिकूल परिस्थितीतही सातारची जनता शरद पवारांच्याच पाठीशी Sharad Pawar’s Ncp उभी राहिली व पोटनिवडणुकीत राजेंचा पराभव करुन पवारांच्या पक्षाचे श्रीनिवास पाटील Shriniwas Patil यांनी निवडून दिले होते. यावेळी मात्र इथे ना राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ आहे ना हाताचा पंजा.
म्हणजे राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवारांकडे Ajit Pawar’s गेले व त्यांनी ही जागा भाजपला दिल्यामुळे इथे घड्याळाचा उमेदवार नसेल. तर वर्षानुवर्षे शरद पवारांना मानणारा इथला मतदार असून त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली असली तरी पवारांकडे आता घड्याळ चिन्ह नसल्याने शिंदे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. म्हणजे राजे किंवा शिंदे यापैकी कुणही जिंकले तरी साताऱ्यात यंदा प्रथम कमळ उगवू शकेल किंवा तुतारीचा आवाज निनादेल. ‘घड्याळा’ची परंपरा मात्र खंडित होईल.
Satara Loksabha- Udayan Raje is Bjp’s candidate
युतीचे ९ उमेदवार वेटिंगवरच Mahayuti’ 9 candidates are on waiting
उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाली असली तरी महायुतीचे अजून ९ उमेदवार वेटिंगवरच आहे. हे सर्व जण शिंदेसेना व अजित पवार गटाचे आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही. तरी भाजपने २५, शिंदेसेनेने ९ व अजित पवार गटाने ४ उमेदवार जाहीर केले आहेत. परभणीची एक जागा रासपला दिली आहे. आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, पालघर व मुंबईतील तीन मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत.
नाशिकमध्ये भुजबळांचे नाव आघाडीवर Chagan Bhujbal Final in Nasik
महायुतीत सातारची जागा अजित पवार गटाकडे येत होती. पण भाजपने उदयनराजेंसांठी ती मागून घेतली. त्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. तेथील शिंदेसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कट करुन दादा गटाचे मंत्री छगन भुजबळ Chanagn Bhujbal यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरीत नारायण राणे व शिंदेसेनेचे किरण सामंत यांच्यात स्पर्धा आहे, पण राणेंनी प्रचारच सुरू के्ल्याने त्यांचे नाव फायनल होण्याची Narayan Rane will be candidate in Ratnagiri दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे व त्यांचा मुलगा श्रीकांत यांचा कल्याण मतदारसंघातील उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. भाजप मुंबईत अजून एखादा उमेदवार जाहीर करू शकते व अजितदादा गटाचा फक्त नाशिकबाबतचा निर्णय बाकी आहे. उर्वरित सर्व जागांवर शिंदेसेनेचेच उमेदवार जाहीर करणे बाकी आहे.