Seat sharing of Mahayuti was decided महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब; भाजपला ३० ते ३२ जागा, उर्वरित १६ ते १८ जागांवर शिंदेसेना, अजित पवार गटाची बोळवण
मिशन लोकसभा महाराष्ट्र Mission Loksabha Maharashtra
Seat sharing-of-mahayuti-was-decided
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा महायुतीच्या जागावाटपातील तेढ सोडवण्यासाठी फायदेशीर ठरला. महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० ते ३२ जागा (BJP Got 30 to 32 seats in Maharahstra) लढवण्याच्या निर्णयावर भाजप शेवटपर्यंत ठाम राहिले. २२ जागांची मागणी करणाऱ्या शिंदेसेनेला फार तर १२ ते १३ जागा मिळू शकतील (Eknath Sinde Shisena 12 to 13 seats) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ ते ५ जागांवरच समाधान मानावे लागेल. (Ajit Pawar’s NCP Got 4 to 5 Seats only).
महाराष्ट्रातून यंदा ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अनुक्रमे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोबत आणले, सत्तेचा वाटाही दिला. मात्र भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात या दोन्ही बंडखोर पक्षांना लोकसभा निवडणुकीत फारसे अनुकूल वातावरण नाही. त्याउलट उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे जनतेची सहानुभूती जास्त आहे. भाजपला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendr Modi Guarantee) नावावर चांगली मते मिळू शकतात. या निष्कर्षाच्या आधारे भाजपने लोकसभेच्या सर्वाधिक ३२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१९ मध्ये शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी २२ जागा तर आम्हाला हव्याच असा हट्ट शिवसेनाचा होता. अजितदादा गटानेही १० जागांची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना त्यांना खूप समजावले पण शिंदे, पवार तडजोडीस तयार नव्हते. त्यामुळे महायुतीचे जागावाटप रखडले होते.
Seat sharing-of-mahayuti-was-decided
अमित शाह यांच्या तीन बैठका फलदायी
४ मार्च रोजी रात्री अमित शाह (Amit Shah in Sambhajinagar) यांचे संभाजीनगरात आगमन झाले. तिथे देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी तब्बल ३ तास महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती समजावून घेतली. ‘एनडीएचे यंदा ४०० खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे एक-एक जागा महत्त्वाची आहे. काहीही झाले तरी लोकसभेच्या जागावाटपात तडजोड करु नका. हवे तर विधानसभेला आपण शिंदे गट व अजित पवार गट यांना जास्त जागा देऊ पण लोकसभेला आपल्या ठरल्यानुसारच मतदारसंघ घ्या. दोन्ही मित्रपक्षांना हे समजावून सांगा,’ असे निर्देश शाह यांनी या बैठकीत दिले होते.
Seat sharing-of-mahayuti-was-decided
मुंबईत दुसरी बैठकही रात्रीच (NDA Meeting in Mumbai)
५ मार्च रोजी संभाजीनगर येथील सभा आटोपल्यानंतर रात्री १० च्या सुमारास अमित शाह (Amit Shah) मुंबईत गेले. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ६ मार्च रोजीही दुपारी या सर्व नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा झाली. ‘लोकसभेला तुमच्या पक्षाबाबत फारसे अनुकूल सर्व्हे नाहीत. त्यामुळे तुम्ही भाजपला जास्तीत जास्त जागा लढू द्या. जिथे तुमच्या पक्षाची निवडून येण्याची क्षमता आहे तेवढ्याच जागा घ्या. यावेळी आम्ही सांगतो ते एेका. आता तुम्ही भाजपसाठी जितक्या जागा सोडाल त्याची भरपाई विधानसभेत केली जाईल. त्यावेळी तुम्हाला जास्त जागा देऊ,’ अशा शब्द शाहा यांनी शिंदे व पवार यांची समजूत काढली. थोडीशी घासाघीस करत दोघांनीही शाह यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला.
जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला असा
Final seat Sharing Foumula of Mahayuti
भाजपला ३० ते ३२ जागा, शिंदेसेना १२ आणि अजित पवार गटाला ४ जागा असे एकूण ४८ जागांचे वाटप महायुतीत ठरले आहे. ७ मार्च रोजी केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपची दुसरी यादी जाहीर होईल. त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल. एकदा का भाजपची दुसरी यादी जाहीर झाली की त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गट हेही आपले उमेदवार जाहीर करतील. ७ मार्च रोजीच महायुतीच्या नेत्यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद होऊन याबाबत घोषणा केली जाऊ शकते.
निवडून येण्याची क्षमता हाच निकष
winning capacity is only Eligibility of candidate
सुरुवातीला ज्याचा जिथे खासदार त्या जागा संबंधित पक्षाला असा महायुतीत फॉर्म्युला असल्याचे सांगितले जात होते. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकदा माध्यमांना हेच सांगितले. मात्र आता शिंदे सेनेचे अनेक खासदार डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे ‘अॅन्टी इन्कबन्सी’चा धोका पत्कारुन त्यांना उमेदवारी देता येणार नाही. भाजपच्या काही खासदारांबाबतही असाच नकारात्मक अहवाल पक्षाकडे आहे. अशा उमेदवारांचे तिकिट रद्द करा. ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी द्या, असे अमित शाह यांनी तिन्ही पक्षांना ठणकावून सांगितले. मित्रपक्षाचे उमेदवारही आपलेच आहेत, असे समजून तिन्ही पक्षांनी काम करावे. कुठेही दगाफटका होता कामा नये. जिथे एखादा नेता महायुतीच्या विरोधात काम करेल, त्याला त्याची जागा दाखण्यात येईल, असा इशारा देऊन अमित शाह यांनी बंडखोरीला चपराक देण्याचा प्रयत्न केला.
पंकजा मुंडेंना बीडची उमेदवारी
(Pankaja Munde is Bjp’s Candidate in Beed)
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे Pankaja Munde भाजपमध्ये दुर्लक्षित आहेत. त्यांनी स्वत: याबाबत अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद, राज्यसभेसाठी अनेकदा त्यांच्य नावाची चर्चा झाली, पण संधी काही मिळाली नाही. आता अजितदादा गटाशी भाजपची युती झाल्याने परळी विधानसभा मतदारसंघातही पंकजा Pankaja Munde यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. कारण तिथे दादा गटाचे नेते धनंजय मुंडे Dhananjay Munde विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शेवटच्या पर्याय म्हणून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला. संभाजीनगरच्या बैठकीत अमित शाह यांनी त्यांना तसे थेट सांगितले. त्यामुळे पंकजा यांना आता आपलीच बहिण व बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे (Preetam munde) यांचे तिकिट कापून स्वत:साठी उमेदवारी भरावी लागेल.
Pankaja Munde replaces Pritam Munde in Beed
खरे तर यापूर्वीच्या मेळाव्यात पंकजा यांनी कार्यक्षम खासदार प्रीतम यांना घरी बसून मी लोकसभा लढणार नसल्याचे जाहीर केले होते. पण आता पक्षादेशापुढे त्यांचे काही चालणार नाही. आता लोकसभेची ऑफर घेतली नाही तर पुढील ५ वर्षे पुन्हा अडगळीतच राहावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराही पक्षाकडून त्यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते.