December 13, 2024

बारामतीत शरद पवार, सुप्रियांनी अजितदादांचा प्रयत्न उधळून लावला

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत नमो रोजगार महामेळावा आयोजित करुन केला

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत नमो रोजगार महामेळावा आयोजित केला. या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा दादांचा प्रयत्न शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी हाणून पाडला. सरकारला या दोघांनाही कार्यक्रमाला बोलवावेच लागले.

Sharad Pawar Ajit Pawar Baramati Namo Melava Controversy

बारामती : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत नमो रोजगार महामेळावा आयोजित करुन शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करुन शेकडो युवकांना खासगी कंपन्यांमार्फत नोकऱ्या देण्याचे नियोजन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमापासून स्थानिक खासदार व आपले काका- चुलतबहिण अनुक्रमे शरद पवार व सुप्रिया सुळे यांना दूर ठेवले. मात्र आपल्या ‘चतुराई’ने शरद पवार यांनी या कार्यक्रमात आपल्याला रितसर बोलावणे सरकारला भाग पाडले. त्यामुळे शरद पवारांशिवाय बारामतीत मोठा कार्यक्रम घेण्याचे अजितदादांचे मनसुबे अयशस्वी झाले.
अजित पवार यांनी जुलै महिन्यात शरद पवारांशी बंड करुन भाजपशी युती करुन सत्ता प्राप्त केली. त्यानंतर डावपेच आखत व भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी पक्षावरही कब्जा मिळवला. आता भाजप अजितदादांच्या माध्यमातून बारामतीत मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचे डावपेच आखत आहे. त्यादृष्टीने युवकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने बारामतीत शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

सरकारी कार्यक्रम असल्याने त्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सदस्यच हजर होते. राज्यातील इतर जिल्ह्यातील असे अनेक रोजगार मेळावे झाले तिथेही विरोधकांना सरकारने कधी व्यासपीठावर बाेलावले नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली लोकप्रियता अजून वाढवण्याचा अजितदादांचा डाव शरद पवारांच्या लक्षात आला. त्यांनी मग ‘गांधीगिरी’ने सरकारशी डावपेच लढवण्यास सुरुवात केली.

निमंत्रण पत्रिकेत शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे नावच नाही

Sharad Pawar and Supriya Sule’s names are not in the invitation card

सुरुवातीला कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार व सुप्रिया सुळे या दोन्ही खासदारांची नावे नव्हती. त्यावर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले. त्यात ‘आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामतीत येत आहात. आपल्या उपस्थितीत बारामतीकरांच्या हितासाठी होणाऱ्या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्यास मला व सुप्रियाला आवडेल. तसेच आपण प्रथमच बारामतीत येत असल्याने आपण मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह (देवेंद्र फडणवीस, अजित पवार) आमच्या घरी भोजनास यावे’ असे निमंत्रण या पत्राद्वारे शरद पवारांनी पाठवले. त्यामुळे लाजेकाजे मुख्यमंत्र्यांना पुन्हा निमंत्रण पत्रिका बदलून त्यात शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे नाव टाकावे लागले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विन्रमपणे शरद पवार यांचे भोजनाचे निमंत्रण नाकारले. पण या निमित्ताने शरद पवार, सुप्रिया सुळे यांना युवा मतदारांचे लक्ष वेधणाऱ्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून भाषण करण्याची संधी मिळाली. दुसरीकडे शरद पवारांना डावलून बारामतीत मोठा रोजगार मेळावा घेण्याचा अजितदादांचा डाव फसला.


सुप्रियांनी दादा- वहिनींकडे पाहणे टाळले
दादांनी केला नाही ताईचा ‘खासदार’ उल्लेख

  • मेळाव्याच्या सुरुवातीला सर्व मान्यवर व्यासपीठावर आगमन झाले. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. शेजारी उभ्या अजितदादांकडे व व्यासपीठावरील सुनेत्रा पवार यांच्याकडे मात्र त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही, अजित पवारांनीही त्यांच्याकडे पाहिले नाही.
  • शरद पवार यांनी व्यासपीठावर येताच हात उंचावून उपस्थित युवकांना अभिवादन केले. त्यांना युवकांमधून उदंड प्रतिसाद मिळाला.
  • अजितदादांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला पण ‘खासदार’ म्हणणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. तर
  • बारामती शहराच्या विकासात शरद पवार आणि अजित पवारांचे मोठे योगदान आहे. सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो, असे गौरवोद‌्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचे व त्यांच्या माध्यमातून झालेल्या बारामतीच्या विकासाचे कौतुक केले.

    तरुणांना रोजगार देण्यासाठी
    राजकारण सोडून एकत्र या : शरद पवार

    शरद पवार म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज आहे. त्यासाठी राजकारण सोडून सगळ्यांनी एकत्र यावे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू.

About The Author