राज्यात अनुकूल वातावरण असतानाही शरद पवार राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरणास तयार

Sharad pawar indicates-Ncp will Merge in Congressआमची अन् काँग्रेसची विचारधारा सारखीच, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची विचाराधाराही आमच्या सारखीच : शरद पवार

Sharad pawar indicates-Ncp will Merge in Congress
मुंबई :
महाराष्ट्रात अटीतटीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव सेनेला अनुकूल वातावरण असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या राजकीय समीकरणाबाबत वक्तव्य करुन नवा बॉम्बगोळा टाकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर्क- वितर्कांना उधाण आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना शरद पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देशातील काही छोटे प्रादेशिक पक्ष एक तर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये थेट विलिन होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही गांधी आणि नेहरुंच्या विचारसरणीवर चालणारा आहे. आमची विचारसरणीही काँग्रेस पक्षाच्या जवळची आहे. पण राष्ट्रवादीचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये होईल की नाही याबाबत मी आताच काही ठामपणे सांगू शकत नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय होऊ शकतो. मात्र असा निर्णय झालाच तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पचनी पडणार नाही. Sharad pawar indicates-Ncp will Merge in Congress

महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे यांची विचारधाराही आमच्यासारखीच आहे. ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.
मुळात काँग्रेसपासून विभक्त होत १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणाऱ्या शरद पवारांना आता २५ वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसची ओढ का लागली आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून, महाशक्तीच्या मदतीने पक्ष व निवडणूक चिन्ह शरद पवारांकडून हिसकावून घेतले. त्यानंतर शरद पवारांकडे उरलेला गट गलितगात्र झाला. कार्यकर्ते सैरभैर झाले. पण शरद पवार खचले नाहीत. ८३ व्या वर्षीही पायाला भिंगरी लावून त्यांनी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. राष्ट्रवादी पक्षाची नव्याने बांधणी केली. सुमारे वर्षभरात त्यांनी पुन्हा इतक्या मजबुतीने पक्ष बांधला की आता महायुतीला त्यांचे आव्हान वाटू लागले आहे. तीच गत उद्धव ठाकरे यांची. या दोन्ही नेत्यांबाबत महाराष्ट्राला सहानुभूती वाटत आहे. म्हणूनच तर शून्यातून नव्याने सुरुवात करणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला लोकसभेत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना शरद पवारांनी पुन्हा काँग्रेस विलिनीकरणाचा गौप्यस्फोट केल्याने महाराष्ट्राचे राजकारणात पुन्हा काय नव्या घडामोडी घडणार.. याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
सत्तधारी महायुतीच्या नेत्यांनी मात्र शरद पवारांच्या या वक्तव्याची हेटाळणी करुन त्यांच्यावर आता हीच वेळ आल्याची टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde म्हणाले, ‘शरद पवारांची वक्तव्ये सूचक असतात. आता विलिनीकरणाची फक्त औपचारिकता बाकी आहे. उद्धव ठाकरेही आता काँग्रेसमय झालेले आहेतच, त्यांचाही पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होईल.’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकाची निकाल लागताच ४ जून रोजी राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंचा पक्ष दोन्हीही काँग्रेसमध्ये जातील, यात शंकाच नाही.’
उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar म्हणाले, ‘शरद पवारांसाठी पक्ष विलिनीकरण काही नवीन नाही. यापूर्वी त्यांनी समाजवादी काँग्रेस हा पक्ष काढला होता, नंतर तो १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये विलिन केला होता,’ अशी आठवणी दादांनी करुन दिली.

मला बाप बदलण्याची गरज नाही : उद्धव ठाकरे I don’t need to change my father: Uddhav Thackeray

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी मात्र शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचे व भाजपने केलेल्या टीकेचे स्पष्ट शब्दात खंडन केले. ‘कुठल्याही पक्षात विलिन व्हायला शिवसेना काय छोटा पक्ष आहे काय? काही लोकांनी आमच्या बापाचे नाव व पक्ष चोरला. पण मला बाप बदलण्याची गरज नाही. ती भाजपवाल्यांना आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवार यांचा राजकीय इतिहास
Political history of Sharad Pawar

शरद पवार Sharad pawar यांचा राजकीय इतिहास पाहिला तर यापूर्वी दोन वेळा त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत नवीन पक्ष स्थापन केलेला आहे. आणीबाणीनंतर १९७८ मध्ये शरद पवार रेड्डी काँग्रेसमधून बाहेर पडले होते. समाजवादी (एस) काँग्रेसची स्थापना करुन काही समाजवादी नेत्यांच्या मदतीने त्यांनी पुलोद सरकार स्थापन केले व पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर १९८० मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपतींनी त्यांचे सरकार बरखास्त केले होते.
• पुढे इंदिरा गांधी यांचे १९८४ मध्ये निधन झाले. त्यानंतर १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी आपली एस काँग्रेस विलिन केली. छत्रपती संभाजीनगरमध्येच (तेव्हाचे औरंगाबाद) त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
• राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी उशिरा का होईना पक्षाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी सोनियांच्या काही निकटवर्तीयांमुळे शरद पवार यांना पक्षात दुय्यम वागणूक दिली जात असल्याची पवारांची भावना झाली. त्यामुळे विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी १९९९ मध्ये पुन्हा काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीची स्थापना केली. त्याला सुमारे २५ वर्षे होत आहेत. आता पुन्हा त्यांना काँग्रेसची ओढ लागलेली दिसते.

 सुप्रिया सुळेंच्या राजकीय भवितव्याची शरद पवारांना काळजी : निरुपम

• पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते व आता शिंदेसेनेत गेलेले माजी खासदार संजय निरुपम म्हणतात, ‘मुलगी सुप्रिया सुळे यांचे राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याची शरद पवारांच जुनीच इच्छा आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे तसा प्रस्तावही दिला होता. पण त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्रे सुप्रिया सुळेंकडे सोपवावीत, अशी अट टाकली होती. ती काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मान्य केली नाही, त्यामुळे त्यावेळी निर्णय होऊ शकलेला नाही. आता पक्ष फुटल्याने शरद पवार पुन्हा प्रयत्न करत असतील. पण आता त्याचा ना पवारांना फायदा होईल ना काँग्रेसला. कारण दोन्ही पक्ष आता शून्यावर आलेले आहेत.’
• काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचे म्हटले आहे. ‘मागच्या आठवड्यात पुण्यात सभेसाठी आलेल्या राहुल गांधी यांनी याबाबत कल्पना दिली होती. भाजपविरोधात एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वात शक्ती एकवटण्याची काही प्रादेशिक पक्षांची इच्छा असल्याचे राहूल म्हणाले होते. शरद पवार जे काही सांगत आहेत त्यात नक्कीच तथ्य आहे,’ असे पटोले म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics