बारामतीतील कार्यक्रमापासून स्थानिक खासदार व आपले काका- चुलतबहिण अनुक्रमे शरद पवार व सुप्रिया सुळे यांना दूर ठेवले. मात्र आपल्या ‘चतुराई’ने शरद पवार यांनी या कार्यक्रमात आपल्याला रितसर बोलावणे सरकारला भाग पाडले. बारामतीत कुठलाही राजकीय कार्यक्रम आपल्याशिवाय होऊच शकत नाही, हे पुन्हा पवारांनी सिद्ध केले.
सुप्रियांनी दादा- वहिनींकडे पाहणे टाळले,
मेळाव्याच्या सुरुवातीला सर्व मान्यवर व्यासपीठावर आगमन झाले. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. शेजारी उभ्या अजितदादांकडे व व्यासपीठावरील सुनेत्रा पवार यांच्याकडे मात्र त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही, अजित पवारांनीही त्यांच्याकडे पाहिले नाही.
दादांनी केला नाही ताईचा ‘खासदार’ उल्लेख
अजितदादांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला पण ‘खासदार’ म्हणणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. तर
बारामती शहराच्या विकासात शरद पवार आणि अजित पवारांचे मोठे योगदान आहे. सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
https://missionpolitics.com/ncp-ajit-pawar-bjp-harshvardhan-patil-induapur-conflicts/