शरद पवारांचा डाव फसला; महादेव जानकर महायुतीतच, शिंदे- फडणवीसांनी केली नाराजी दूर
माढा किंवा परभणीतून महायुतीतर्फे उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत
मुंबई : गेली १० वर्षे महायुतीत असूनही भाजपकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीमुळे नाराज असलेले महादेव जानकर Mahadev Jankar यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २४ मार्च रोजी यश आले. Sharad Pawar’s game failed-Mahadev Jankar with bjp. नाराज जानकरांना महाविकास आघाडीत ओढून माढ्याची उमेदवारी द्यायची व त्याबदल्यात बारामतीतील निर्णायक धनगर समाजाची मते सुप्रिया सुळेंच्या पारड्यात ओढायची असा डाव शरद पवारांनी टाकला होता. जानकरही त्याला अनुकूल प्रतिसाद देत होते, मात्र हा धोका वेळी ओळखून फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करत महायुतीतर्फे उमेदवारीची ऑफरच दिली.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या मदतीने भाजपने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली तेव्हापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरMahadev Jankar, सदाभाऊ खोत Sadabhau Khot या जुन्या मित्रमंडळींचा भाजपला विसर पडला होता. नव्या सत्तेत यांना कुठेच स्थान देण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर समन्वय समितीच्या बैठकीतही त्यांना कुणी विचारत नव्हते. त्यामुळे जानकर, खोत खूप नाराज होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांना जानकर बहिण मानतात. पंकजा यांनाही पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याबद्दल जानकर यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठावरुन भाजप नेतृत्वाला खडे बोल सुनावले होते. दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या Dhangar Reservation मुद्द्यावर राज्यात जी आंदोलने झाली त्या व्यासपीठावरुनही जानकरांनी अनेकदा भाजपला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली होती. एकूणच गेल्या दोन वर्षांपासून जानकर व भाजप यांच्यातील अंतर वाढत चालले होते.
शरद पवारांनी टाकले जाळे Sharad Pawar’s game Fail
जानकरांची ही नाराजी ओळखून शरद पवारांनी Sharad Pawar त्यांच्यावर जाळे टाकले होते. जानकरांची इच्छा असेल तर मविआतून त्यांच्यासाठी माढाची जागा सोडू, अशी जाहीर ऑफर शरद पवारांनी दिली होती. भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जानकरही पवारांची ऑफर स्वीकारण्यास अनकूल झाले होते. मात्र हा धोका ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी जानकरांशी २४ मार्च रोजी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर केली. इतकेच नव्हे तर जानकरांना महायुतीतून लोकसभेचा एक जागा देण्याचा शब्दही दिला. ही ऑफर जानकरांनी स्वीकारल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला.
का हवेत युतीला जानकर? Why Mahadev Jankar important
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा एक आमदार गंगाखेडमधून निवडून आलेला आहे. ते स्वत: जानकर हे विधान परिषदेवर होते. धनगर समाजाचे नेते Dhangar Samaj’s Leader म्हणून त्यांना ओळखले जाते. या समाजाचे राज्यात ९ ते १० टक्के मतदार आहेत. विशेषत: परभणी, माढा, बारामती या लोकसभा मतदारसंघात त्यांचे मते निर्णायक मानले जातात.
बारामतीत bramati loksabha २०१४ च्या निवडणुकीत महादेव जानकर सुप्रिया सुळे supriya sule यांच्याविरोधात उभे होते. तेव्हा त्यांना ४ लाख ५१ हजार मते पडली होती. मात्र ते ७० हजार मतांनी पराभूत झाले होते.
या वेळी बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजित पवार Sunetra Ajit pawar यांचा सामना आहे. त्यात धनगर समाजाची Dhangar Vote Bank निर्णायक मते आतापर्यंत पवारांविरोधात पडत आली आहेत. ती यावेळी सुनेत्रा पवारांच्या पारड्यात पडावीत यासाठी अजित पवारांना जानकरांची साथ हवी होती.
दुसरीकडे, शरद पवार Sharad Pawar यांनाही जानकरांची मदत हवी आहे. म्हणूनच त्यांनी जानकरांना माढ्यातून निवडून आणण्याची हमी देत त्यांच्या व्होटबँकेची बारामतीत मदत घेण्याची रणनीती आखली होती. मात्र शरद पवार यांचा हा डाव फसला. देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच डावपेच खेळत जानकरांची नाराजी दूर केली.
अजितदादांना करावा लागेल परभणीचा त्याग Ajitdad will have to sacrifice Parbhani
जानकर यांना आता महायुतीकडून माढा किंवा परभणीतून उमेदवारी मिळू शकते. माढ्यात madha loksabha भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjeet nimbakar यांना आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांना भाजपचे दिग्गज नेते धैर्यशील मोहिते पाटील, अजितदादा गटाचे रामराजे निंबाळकर यांचा तीव्र विरोध आहे. या दोघांचीही फडणवीसांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात यश आले नाही तर एेनवेळी निंबाळकरांना खाली बसून तिथे जानकरांना उभे केले जाऊ शकते.
माढ्यात निंबाळकरांना होणारा विरोध शमला तर मग महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी मिळू शकते. कारण या मतदारसंघातही धनगरांची मते निर्णायक आहेत. मात्र येथून अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र बारामतीत जानकरांची मदत हवी असेल तर अजितदादांना परभणीच्या जागेचा त्याग करावा लागेल. आपल्या पत्नीच्या विजयासाठी ते करण्यास अजितदादा मागेपुढे पाहणार नाहीत. त्याच बोलीवर जानकरांची नाराजी दूर करण्यात आल्याचे बोलले जाते. कदाचित, या मतदारसंघात जानकर अजितदादांच्या चिन्हावर लढू शकतात.