साखळी उपोषण थांबवून तयारीला लागा; मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन
राज्यात मराठा आंदोलनासाठी साखळी उपोषण सुरुय. मात्र 20 जानेवारीला जायची तयारी करायची आहे. त्यामुळं अंतरवली साखळी उपोषण सोडता सगळ्यांनी उपोषण स्थगित करावे ही विनंती आहे. ज्यांना सुरू ठेवायची आहे त्यांनी सुरू ठेवावे मात्र आमचा आग्रह आहे सध्या सगळे उपोषण स्थगित ठेवावे. लवकरच आपला महाराष्ट्र दौरा तयारीसाठी म्हणून सुरू करतोय. सगळ्यांनी तयारीला लागा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकिलांची फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्वाचं आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये. सर्वोच्च न्यायालयात आपण सर्व बाबी मांडू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आंदोलनकर्ते, विरोधी पक्ष आणि सरकारचं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एकमत आहे. आता क्युरेटिव्ह याचिकेवर २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कुणीही घाईगडबडीनं निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जरांगे-पाटलांना केलं आहे.