मोबाईल घेऊन देत नसल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे मसराम कुटुंब रात्री जेवणासाठी बसले होते. जेवण झाल्यावर श्रावणीने आईला खर्रा खाण्यासाठी 20 रुपये दे, नाहीतर मोबाईल घेऊन दे, असे म्हणत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावला. पैसे नसल्याने नंतर मोबाईल घेऊ, असे तिच्या आईने सांगितले. मात्र, श्रावणीने ऐकले नाही. मोबाईल घेऊन देण्यासाठी लावलेल्या तगाद्याने संतापलेली श्रावणीची आई तिच्यावर रागावली होती. रात्री दहा वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी स्नानगृहात श्रावणीने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.
वडिल लघुशंकेसाठी उठले असता आवाज देऊनही दार उघडत नसल्याने दाराचा कोंडा तोडून दार उघडले. मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.