एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट : फडणवीसांसह भाजपच्या चार नेत्यांच्या अटकेचा होता उद्धव ठाकरेंचा डाव

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांचा दोन वर्षांनी खळबळजनक दावा

thackerays-plan-was-to-arrest-4-bjp-leaders-along-with-fadnavis

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis, गिरीश महाजन Girish Mahahjan, आशिष शेलार Ashish Shelar व प्रवीण दरेकर Pravin Darekar या चार नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याचा कट रचला हाेता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. विशेष म्हणजे ठाकरे सरकारमध्ये शिंदेही कॅबिनेट मंत्री होते, तेव्हा व ठाकरेंची साथ सोडल्यानंतरही दोन वर्षात त्यांनी या विषयावर कधीही भाष्य केले नाही. मात्र आता एेन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे गौप्यस्फोट केल्याने त्याकडे संशयाने पाहिले जात आहे. भाजप नेत्यांनी मात्र शिंदेंचे हे अारोप खरे असल्याचे दावे केले आहेत.
शिंदे Eknath shinde म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते. महाविकास आघाडीची स्थापना हा पूर्वनियोजित कट होता. बाळासाहेबांप्रमाणे ‘किंगमेकर’ होण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना स्वतः ‘किंग’ व्हायचे होते.’

आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप
Aditya Thackeray’s intervention

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री म्हणून आपला कार्यकाळ ठाकरे कुटुंबाकडून सतत होणाऱ्या अपमान आणि शंभर टक्के हस्तक्षेपाने भरलेला होता. मी नगरविकास मंत्री असूनही, मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही, कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरेंची Aditya Thackeray ढवळाढवळ होती. अनेक वेळा ते नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठका परस्पर बोलवायचे,’ असा आरोपही शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा डाव आखत होते. नक्षलवाद्यांकडून धमकी असूनही, त्यांनी मला झेड प्लस सुरक्षा दिली नाही, असाही आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

मी त्यांना अडथळा वाटायचो

“आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गात ठाकरेंना मी अडथळा वाटत होतो. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची घाई झाली होती.’असेही शिंदे म्हणाले.

उद्धव यांना मुख्यमंत्रिपदाची लालसा Uddhav longs for Chief Ministership

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवले, असे आतापर्यंत सांगितले जात होते. मात्र शिंदे यांनी त्याचा इन्कार केला. शिंदे म्हणाले, ‘ठाकरेंनीच स्वतःला मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते. जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होते, तेव्हा मला मुख्यमंत्री केले जाईल, या अपेक्षेने मला आणखी पोलिस बंदोबस्त मिळाला होता, परंतु नंतर ठाकरेंनी मला सांगितले की शरद पवार यांनी त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले आहे. नंतर पवारांनीच मला हे सांगितले की, शिवसेनेने त्यांच्याकडे काही जणांना पाठवलं आणि ठाकरेंच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं. म्हणजे ठाकरेंनीच पवारांना स्वतःच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले होते,’असा दावाही शिंदेंनी केला.

सूरतला जाताना ठाकरे म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्री करतो

माझ्यासह काही अामदार सूरतला गेलो, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. ‘तुला मुख्यमंत्री करतो, परत ये’ असे त्यांनी सांगितले होते. पण तेव्हा फार उशिर झाला होता. मी एेकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ठाकरेंनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांना फोन करुन आपण एकत्र येऊ, पुन्हा युतीचे सरकार महाराष्ट्रात आणू, असे सांगितले होते. पण ‘आता खूप उशिर झालाय’ असे सांगून भाजपनेही त्यांना दाद दिली नाही, असा गौप्यस्फोटही शिंदेंनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics