संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे, परभणीतून संजय जाधव फायनल
मुंबई : मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरुन सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत. महाविकास आघाडीत ४८ पैकी ४० जागा वाटपावर एकमत झाले असून फक्त ८ जागांचा निर्णय बाकी राहिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीत शिवसेनेला १९ ते २० जागा मिळणार आहेत. त्यापैकी ११ जणांची नावे उद्धव ठाकरे यांनी अंतिम केली आहेत. यात मराठवाड्यातील तीन जागांचा समावेश आहे.
१. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
२. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (विद्यमान खासदार)
३. परभणी- संजय जाधव (विद्यमान खासदार)
४. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
५. बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
६. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
७. रायगड – अनंत गीते
८. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत (विद्यमान खासदार)
९. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (विद्यमान खासदार)
१०. वायव्य मुंबई – अमोल गजानन किर्तीकर
११. ठाणे – राजन विचारे (विद्यमान खासदार)