उद्धव ठाकरे पागल हो गये है… ठाकऱ्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा

 राम मंदिर ही काही भाजपची प्रॉपर्टी नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे पागल हो गये है. उद्धव ठाकरे सोडल्यास राम मंदिर कोण बांधतंय हे संपूर्ण जग जाणून आहे. भाजपची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू गेलं. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. त्याला काय अक्कल आहे. राम ही भाजपची प्रॉपर्टी नाही. राम देव आहे. ती सर्वांचीच प्रॉपर्टी आहे, अशी खोचक आणि जोरदार टीका नारायण राणे यांनी केली.

वांद्रे येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नारायण राणे यांच्या हस्ते हेमा मालिनी यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या सर्व्हेवरही भाष्य केलं. जनता काँग्रेस आघाडीसोबत नाही. उद्धव ठाकरे यांना विकृत बोलायला काहीच हरकत नाही. उद्धव यांच्यासोबतही जनता नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला.

कोण इंडिया आघाडी? आमचाही सर्वे झाला आहे. आम्हीच शंभर टक्के जिंकणार आहोत. पैसे देऊन करण्यात आलेल्या सर्व्हेवर आमचा विश्वास नाही, असं राणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics